अमरावती : राजकारणात राजकीय स्वचरित्र असावे लागते. परंतु सध्याच्या राजकीय घडामोडीमुळे राज्यातील राजकारण हे चारित्र्यहीन झाले आहे. विचारांशी बांधिलकी राहिलेली नाही. सत्तेसाठी विकाऊ वृत्तीची माणसे बाजारात आली असून, खरेदीदारदेखील उभे आहेत, अशी टीका शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी येथे माध्यमांशी बोलताना केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – वाशीम : एक रुपयात पीक विमा घोषीत; काही केंद्रांवर अतिरिक्त शुल्क आकारणी

उद्धव ठाकरे यांची अमरावतीत १० जुलैला संवाद सभा होणार आहे. त्याअनुषंगाने खासदार सावंत, खासदार विनायक राऊत यांनी शनिवारी सभास्थळाची पाहणी करून पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना सावंत म्हणाले, काळ इतका बदलला की माणसांनी माणूसकी विसरली आहे. ज्याने घडविले त्या शिल्पकारालाच विसरले, त्या शिल्पकारालाच घेऊन पळायला लागली आहेत. सध्याच्या राजकारणातून माणूसकी हरवली असून, सत्व आणि तत्त्व उरलेले नाही. कालपर्यंत आमच्या हिंदुत्वावर प्रश्न उपस्थित केले जात होते. आत तेच त्या हिंदुत्वाचे काय झाले हे विचार करताहेत. ज्यांच्यामुळे ते उद्धव साहेबांना सोडून गेले, आज तेच त्यांच्यासोबत मांडीला मांडी लावून बसत आहेत. त्यामुळे मतदारांची चिंता वाटत असल्याचे सावंत यावेळी म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: People with selling attitude for power are in the market says arvind sawant in amravati mma 73 ssb
Show comments