लोकसत्ता टीम
नागपूर: शहर भौगोलिकदृष्ट्या मध्यभागी आहे. वन, पर्यावरण, नैसर्गिक सौंदर्य, भौगोलिक संपन्नता आणि उदात्त जीवनमूल्याचे शहर म्हणून या शहराचा जगभर गौरव आहे. तसेच परकीय आक्रमणापासून सर्वात सुरक्षित आहे. या सर्व बाबींचा विचार करता नागपूरला भारताची राजधानी करावे, अशी मागणी पीपल्स पँथरचे अध्यक्ष अशोक मेश्राम यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली.
यावेळी सरचिटणीस डॉ. भीमराव म्हस्के, कोर कमेटीचे नेते ॲड. लटारी मडावी उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी याच ऐतिहासिक भूमीत १४ आक्टोबर १९५६ रोजी बुद्ध धम्मक्रांतीचे चक्र गतिमान केले. दहाव्या शतकात आदिवासी गोंड राजा बक्त बुलंद शहा (उईके ) यांनी नागपूर शहराची पुर्नस्थापना केली. या शहराला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वेगळपण लाभले आहे.
आणखी वाचा- किळसवाणे! प्रेयसीच्या मुलीवरच नराधमाचा बलात्कार
दिल्ली व मुंबई हे दोन शहर औद्योगिक शहर आहेत तर नागपूर देशाच्या मध्यभागी व सर्वाधिक सुरक्षित आहे. शिवाय, टायगर कॅपिटल, रिझर्व बँक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, नोबल विजेते रामण विज्ञान केंद्र, संत्रा नगरी, मल्टी मॉडेल आंतरराष्ट्रीय कार्गो हब व सर्व राज्यांना जवळ पडेल असे हे शहर असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.