लोकसत्ता टीम

नागपूर : उपराजधानीत सहप्रवाशांनाही हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. परंतु, या सक्तीला सत्ताधारी व विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींनीही कडाडून विरोध केला आहे. मग, फक्त पोलिसांकडूनच सक्तीचा आग्रह का धरला जात आहे, असा सवाल जनमंच या संस्थेने उपस्थित केला आहे. संस्थेचे अध्यक्ष राजीव जगताप यांनी लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट दिली व या विषयावर आपले स्पष्ट मत मांडले.

maharashtra election commissioner news in marathi
राज्य निवडणूक आयुक्तपदाचा आज निर्णय; नितीन करीर, राजीव जलोटा, राजगोपाल देवरा स्पर्धेत
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Manoj Jarange On Dhananjay Munde
Manoj Jarange : ‘धनंजय मुंडे सरकारवरील डाग, त्यांच्या गुंडाची टोळी थांबवा, अन्यथा आम्ही…’, मनोज जरांगेंचा मोठा इशारा
Satej Patil On Municipal Elections 2025
Satej Patil : आगामी महापालिकेच्या निवडणुका काँग्रेस स्वतंत्र लढणार की आघाडीत? सतेज पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, “शक्य असेल तिथे…”
Hemlata Patil
Hemlata Patil : काँग्रेसला मोठा धक्का? ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रवक्त्या डॉ.हेमलता पाटील पक्ष सोडणार?
bhaskar jadhav and uday samant
Uday Samant : “शिवसेनेची काँग्रेस झालीय”, भास्कर जाधवांच्या विधानावर उदय सामंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “मोठ्या नेतृत्त्वाचं…”
BJP started journey to become superpower with record target of registering 1.5 crore workers
भाजप ‘समृद्धी’ महामार्गाने ‘शत प्रतिशत’कडे
Shiv Sena UBT to contest local elections independently
महापालिका निवडणुकांआधी मविआत फूट? ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत स्वबळावर लढणे कितपत शक्य?

जगताप म्हणाले, नागपुरातील अपघात व त्यातील मृत्यू, गंभीर जखमींची आकडेवारी बघितल्यास त्यातील अनेक कारणांपैकी एक कारण हे रस्त्यावरील खड्डे आहेत. सिग्नलचे नियम मोडणे, अतिवेग, ऑटोरिक्षांमध्ये क्षमतेहून जास्त वाहतूक, अशा अनेक कारणांनी अपघात होतात. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी चौका- चौकात उभे राहून नियम मोडणाऱ्यांवर वचक निर्माण करणे अपेक्षित आहे.

आणखी वाचा-अनैतिक संबंधातून जन्मलेल्या बाळाला रस्त्यावर फेकले

परंतु, पोलीस तसे न करता हेल्मेट परिधान न केलेल्या सहप्रवाशावर कारवाईचा बडगा उगारून वरिष्ठांनी त्यांना दिलेले महसुलाचे लक्ष्य पूर्ण करताना दिसत आहेत. शहरात वाढलेली वाहनांची संख्या, गतिरोधक यामुळे वाहनांची गती पूर्वीच्या तुलनेत मंदावली आहे. नागरिक सावध राहूनच वाहने चालवतात. त्यामुळे सहप्रवाशांना हेल्मेटसक्ती करण्यापेक्षा पोलीस व महापालिकेने खड्ड्यांची दुरुस्ती व वाहतूक व्यवस्था चोख करण्याची गरज आहे. महामार्गावर दुचाकी वाहनांचा वेग जास्त असल्याने येथे सहप्रवाशालाही हेल्मेटसक्ती केली तर ते जास्त योग्य ठरेल, असेही जगताप यांनी स्पष्ट केले.

दुचाकींच्या रचनेत दुरुस्ती हवी

चारचाकी वाहनांमध्ये एअर बॅगची सक्ती करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी संबंधित कंपन्यांना कारच्या रचनेत बदलासाठी मुदत दिली होती. त्यानुसार कालांतराने एअर बॅग लागणे सुरू झाले. परंतु दुचाकीवरील सहप्रवाशांना कुठलीही मुदत न देता थेट हेल्मेटसक्ती करण्यात आली. विकसित देशात दुचाकीचे हेल्मेट ठेवण्यासाठी वाहनाच्या पाठीमागे एक डिक्की असते. त्यानुसार भारतातही दुचाकी वाहनाच्या डिझाईनमध्ये दुरुस्ती करूनच ही सक्ती करण्याची गरज आहे. दुचाकीवर दोन हेल्मेट ठेवायचे कुठे, पालकांना दोन मुलांना शाळेत सोडायचे असल्यास तीन हेल्मेट कसे घेऊन फिरायचे, असा सवालही त्यांनी केला.

आणखी वाचा-नागपुरात दरवर्षी विधिमंडळाचे अधिवेशन घेण्याबाबत यशवंतराव चव्हाणांचीभूमिका काय होती ?

लहान मुलांचे हेल्मेट आहेत कुठे?

चार वर्षांवरील सहप्रवाशांना हेल्मेटसक्ती असल्याचे पोलीस सांगतात. परंतु प्रत्यक्षात लहान मुलांचे हेल्मेट नागपुरात उपलब्धच नाही. त्यामुळे ही माहिती पोलिसांनी सक्ती करण्यापूर्वी तपासण्याची गरज आहे. ज्या मुलांना हेल्मेटचे वजन पेलवेल का, त्यांना मणक्याचे आजार झाल्यास जबाबदार कोण, हाही एक गंभीर प्रश्न आहे. ज्येष्ठ नागरिकांनाही हेल्मेटचे वजन पेलवणे शक्य नाही. त्यामुळे या निर्णयावर फेरविचार गरजेचा असल्याचे मत जगताप यांनी व्यक्त केले.

‘आयएसआय’ मार्क असलेल्या हेल्मेटची वानवा

सध्या निम्याहून जास्त नागरिक आयएसआय मार्क नसलेले हेल्मेट वापरतात. या हेल्मेटमुळे वाहन चालकाला कोणतीही सुरक्षा मिळत नाही. आता सहप्रवाशाला हेल्मेटसक्ती केल्यामुळे तेही असेच निकृष्ट हेल्मेट वारतील. ज्यामुळे सक्तीचा काहीच फायदा होणार नाही. सारासार विचार न करता हेल्मेटसक्ती करण्यात आल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. पोलिसांनी जनमंचला या सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्यास हेल्मेटसक्तीला विरोध राहणार नाही, असेही जगताप यांनी स्पष्ट केले.

आणखी वाचा-‘यूपीएससी’कडून विविध परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या कोणती परीक्षा कधी होणार?

पायी चालणाऱ्यांनाही सक्ती करणार काय?

नागपुरातील अनेक अपघातांमध्ये पायी चालणाऱ्यांसह सायकलस्वारांचाही मृत्यू झाला आहे. त्यामुळे पोलीस आता पादचारी व सायकल चालकांनाही हेल्मेटसक्ती करतील का, असा सवाल राजीव जगताप यांनी उपस्थित केला.

Story img Loader