विधानपरिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी सकाळी १० पर्यंत १३.५७ टक्के मतदान झाले आहेआज गडचिरोली जिल्ह्यात सकाळी ७.०० वा. पासून तर अन्य पाच जिल्ह्यांमध्ये ८.०० वा. पासून मतदानास सुरुवात झाली आहे. मतदान शांततेत सुरु असून सकाळी १०.०० वाजेपर्यंत सर्व जिल्हयांमध्ये (गडचिरोली जिल्हयात सकाळी ९.०० वाजेपर्यंत) सरासरी १३.५७ टक्के मतदान झाल्याची माहिती, निवडणूक अधिकारी तथा विभागीय आयुक्त कार्यालयाने दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> Maharashtra MLC Election Results Live: सत्यजीत तांबेंच्या विजयाबाबत शिंदे गटाला विश्वास, दीपक केसरकर म्हणतात…

या निवडणुकीत एकूण २२ उमेदवार निवडणूक लढत आहेत. गडचिरोली जिल्ह्यात १८ मतदान केंद्रांवर मतदान सुरु असून सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत १२.८६ टक्के मतदान झाले आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये ४३ मतदान केंद्रांवर मतदान होत आहे. या जिल्हयात सकाळी १०.०० वाजेपर्यंत ११.९४ टक्के मतदान झाले आहे. भंडारा जिल्ह्यात १२ मतदान केंद्रांवर मतदान होत असून १३.१२ टक्के मतदान झाले आहे. गोंदिया जिल्ह्यातील १० मतदान केंद्रांवर मतदान होत आहे. या जिल्हयात ११.८३ टक्के मतदान झाले आहे. वर्धा जिल्ह्यात १४ मतदान केंद्रावर मतदान होत असून १५.४९ टक्के मतदान झाले आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील २७ मतदान केंद्रांवर मतदान होत आहे या जिल्ह्यात १७.२९ टक्के मतदान झाले आहे.केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार गडचिरोली जिल्ह्यात मतदानाची वेळ सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. तर नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होत आहे .

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Percent voting in nagpur teachers constituency in two hours cwb 76 amy