लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वर्धा : मतदानास एक तास बाकी असताना जवळपास ५७ टक्के मतदानाची नोंद पाच वाजेपर्यंत झाल्याने विक्रमी मतदान नोंदल्या जाण्याची शक्यता व्यक्त होते.

सकाळपासूनच मतदानाने वेग घेतला. दुपारच्या रणरणत्या उन्हातदेखील ग्रामीण भागातील मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा दिसून येत होत्या. मात्र पुरूषांच्या तुलनेत महिलांची उपस्थिती कमी असल्याचे चित्र होते. शहरी मतदान केंद्रापेक्षा ग्रामीण भागातील मतदान केंद्रावर अधिक उत्साह दिसून आला. एकाच वेळी एका कुटुंबातील तीनही पिढ्या मतदान करण्यास पोहचल्याचे दृष्य काही ठिकाणी दिसून आले. आज लग्नतिथी असल्याचे बोलल्या जात होते. त्यामुळे मतदानावर विपरीत परिणाम होण्याची भिती व्यक्त झाली. मात्र, तसे न होता नवरदेवासह लग्नास जाणाऱ्या वऱ्हाडी मंडळींनी प्रथम मतदानाचा हक्क बजावला आणि नंतरच गाव सोडले. नवमतदार, दिव्यांग, तृतीयपंथी, वयस्कर अश्या सर्वच घटकांची उपस्थिती मतदान केंद्रावर दिसून आली.

आणखी वाचा-बुलढाणा : मतदानयंत्र बिघडल्यामुळे अनेक ठिकाणी मतदान खोळंबले… यंत्रणांची धावपळ…

सायंकाळी पाच वाजेपर्यंत एकूण ५६.६७ टक्के मतदान झाले. १६ लाख ८२ हजार ७७१ मतदारांपैकी ९ लाख ५३ हजार ५५३ मतदारांनी पाच वाजेपर्यंत मतदान केले होते. आर्वी सर्वाधिक म्हणजे ६०.८५ टक्के मतदान झाले. धामनगाव- ५३.५८, मोर्शी – ५७.६०, देवळी – ५७.११, हिंगणघाट – ५५.४८ व वर्धा – ५६.६ टक्के मतदान झाले. झालेल्या मतदानात ५९.३० टक्के मतदान पुरूषांचे तर ५३.९२ मतदान महिला मतदारांचे होते. यात सहा तृतीयपंथी मतदार आहे. मतदानाच्या मुदतीनंतर नेमकी आकडेवारी पुढे येईल.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Percentage increased in rural areas compared to urban areas discouragement among women voters pmd 64 mrj
Show comments