चंद्रपूर: चिमूर तालुक्यातील मोटेगाव येथील मोरेश्वर आनंदराव सोनवाने (४५) आणि त्यांचा मुलगा सागर मोरेश्वर सोनवाने वय (11 ) हे दोघे बाप लेक २४ फेब्रुवारी रोजी प्रयागराज येथे महाकुंभ मेळात शाही स्नान करण्यासाठी गोंदिया वरून रेल्वेने निघाले. मात्र परतला तो फक्त मुलगा सागर नियतीसमोर कुणाचेही चालत नसते असे म्हटले जाते त्याप्रमाणे मोरेश्वरच्या जीवनात त्याचा प्रत्यय आला. मोटेगाव येथील मोरेश्वर सोनवाने आणि मुलगा सागर हे दोघेही ३४ फ्रेब्रुवारी ला पत्नी मजुरीला गेली असता तिला न सांगताच कुंभ मेळाव्याला (प्रयगराज) निघून गेले आणि तेव्हापासून त्यांचा गावात शोध सुरू झाला. मात्र गोंदिया वरून रेल्वेने प्रवास सुरू करून जबलपूरसमोर सोनवणे यांच्या दुःखदायक प्रवासाला सुरवात झाली. काही अज्ञात चोरट्यांनी जबरदस्तीने त्यांची बॅग हिसकावून नेली. कसे तरी प्रवास करून प्रयगराज गाठले. गंगा नदीत शाही आंघोळ करून पलीकडील दुसरे तीर गाठले. मात्र पैसे नसल्याने त्यांच्या समोर मोठे संकट उभे झाले. तेव्हा मुलाच्या कानातील बाळी विकून तीन हजार रुपयात पुढील प्रवास सुरु केला
वाराणशी येथे येऊन पुढील मार्गाने जावे मात्र येथेही नियती आडवी आली. गुंडांनी धमकावून त्यांचे पैसे काढून घेतले तसेच मोबाईल सुद्धा घेतला आता काय करावे असा प्रश्न उपस्थित झाला आणि मोरेश्वर यांचे मानसिक संतुलन बिघडले आणि दोघेही बाप लेक वाराणशीच्या रस्त्यावर फिरू लागले. रात्र झाली की कुठेही उघड्यावर झोपायचे कुणी देईल ते अन्न खायचे कुठलाही पाणि प्यायचे असा नित्यक्रम मागील ४३ दिवस बाप लेक यांचा सुरू होता. या दरम्यान त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मुलगा गावाकडे जायचा हट्ट करीत होता तर बाप पैसे नसल्याने मौका मिळाल्यावर गावाला जाऊ असे मुलाला सांगत होता. पण मुलगा पोलिसात जाऊन त्यांना सांगू असे बोलीत होता मात्र बाप पोलीस आपल्याला कारागृहात टाकतील असे सांगून टाळत होता इकडे गावकरी बापलेकांचा शोध घेत होते समाजमाध्यमावर त्यांचे फोटो टाकून माहिती मागत होते मात्र त्यांचा शोध लागला नाही
मध्यंतरी त्यांचा फोन गावात आला होता जबलपूर येथे आहोत तेव्हा गावातून चंदू रामटेके आणि काहीजण तिथे गेले मात्र त्यांचा शोध घेतला पण मिळून आले नाही तेव्हा परत गावाला आले तेव्हापासून त्यांचा शोध लागला नाही अखेर ४३ दिवसानंतर वाराणशी पोलीस ठाण्यातुन फोन आला की आपला मुलगा सुखरूप आहे तेव्हा चंदू रामटेके विलास कोराम संजय सोनवणे यशवंत अडसोळे आणि मुलाची आई व नातलग वाराणसी ला गेले पोलीस स्टेशन गाठले तेव्हा त्यांना वेगळीच घटना डोळ्यासमोर आली. मोरेश्वर यांनी झाडाला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविली होती सदर बातमी गावात कळताच गाव शोकसागरात बुडाला. तेव्हा मुलाने सांगितले की ८ एप्रिलला बाबा महामार्गावरील झाडावर चढले आणि फाशी लागतो असे बोलले तेव्हा मी तात्काळ जवळील पोलीस स्टेशन गाठले मात्र पोलीस घटनास्थळी दाखल व्हायच्या पूर्वीच बाबा निघून गेले.
वाराशिवणी नदीघाटावर मोरेश्वर यांचे अतिंमसंस्कार पार पाडून नातेवाईक आणि गावकरी मुलाला घेऊन घरी परत आले ,आधीचअठराविश्वव दारिद्र्य कुटुंबाची परिस्थिती असल्याने मोरेश्वर निघून गेल्याने आता कसे जीवन जगावे हा प्रश्न मोरेश्वर यांच्या पत्नी समोर आहे दोन मुलाचा सांभाळ कसे करावे हे दुःख घेऊन ती हरवल्यासारखी उभी आहे तेव्हा शासनाने तिच्या कुटूंबाला आर्थिक मदत करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे
आमदार भांगडीया यांनी केली मदत
चिमूरचे आमदार कीर्तिकुमार उर्फ बंटी भांगडीया यांना मोटेगाव येथील विलास कोराम यांनी सदर घटना सांगितली असता आमदार बंटी भंगडीया यांनी वाराणशीला जाण्यासाठी वाहनांसाठी आर्थिक मदत दिली तसेच एवढ्यावरच न थांबता त्यांनी तात्काळ वाराणशी येथील पोलीस स्टेशनला फोन करून मोरेश्वर सोनवाणे यांच्या कुटूंबियांना सहकार्य करावे आणि मदत करावी अशा सूचना दिल्या तसेच प्रशाशकीय अडचणी आल्या तर सोडविल्या जाईल असा विश्वास दिला