नागपूर : आतापर्यंत नागपुरात अनेक घोटाळे झाले असून ठगबाजांनी नागपूरकरांना शेकडो कोटींनी लुटले आहे. हा प्रकार नुकताच समोर आला आहे. हजारो कोटींच्या गुंतवणुकीचे आमिष दाखवून ठगबाज मोठमोठी स्वप्ने रंगवतात. ‘फाईव्ह स्टार’ हॉटेल्समध्ये पार्ट्या आणि सेमिनार घेऊन अनेकांना भूरळ घालतात. अशाच प्रकारे एका ठकबाजाने गुंतवलेल्या रकमेची दामदुप्पट रक्कम परत करण्याचे आणि जमा रकमेवर १० टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांचे एक कोटी ८५ लाख घेऊन कुटुंबासह फरार झाल्याचा खळबळजनक प्रकार नंदनवन पोलीस ठाण्याअंतर्गत जुना बगडगंज परिसरात घडला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या प्रकरणी पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून आरोपीविरूध्द गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोधासाठी एक पथक तयार करण्यात आले आहे. सध्या पीडित गुंतवणूकदारांची संख्या साडेतीनशेच्या जवळपास असून ही संख्या अडीच हजारावर जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

हेही वाचा…कामाला लागा आणि इतिहास घडवा भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणतात,‘…तर खैर नाही’

किशोर प्रभाकर अमृतकर (४५) रा. जुना बगडगंज असे आरोपीचे नाव आहे. घरापासून एक किमी अंतरावर त्याचे प्रभाव या नावाने जनरल स्टोर्स आहे. मागील २० वर्षांपासून तो भीसी आणि आरडी अशा योजना चालवितो. एका वर्षात रक्कम दुप्पट करून देत होता. जमा रकमेवर अतिरिक्त दहा टक्के दराने व्याजही देत होता. दिवाळीत तोगुंतवणूकदारांना त्यांची रक्कम परत करीत असल्याने नागरिकांचा विश्वास बसला.

त्याच्याकडे सामान्य आणि मध्यमवर्गीय कुटुंब मोठ्या प्रमाणावर जुळले. गंगाबाई घाट, हिवरीनगर, जगनाडे चौक, श्रीकृष्णनगर, बगडगंज, नंदनवन आदी परिसरातील जवळपास अडीच हजार लोकांनी त्याच्याकडे गुंतवणूक केल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. मागील २० वर्षांपासून वेळेवर रक्कमेसह व्याज परत करीत असल्याने त्याच्यावर कुणालाच संशय नव्हता.

हेही वाचा…महाराष्ट्र संतांची भूमी येथे “बटेंगे तो कटेंगे”ला थारा नाही…प्रफुल्ल पटेलांच्या गृहनगरातून रोहित पवारांनी…

मात्र, या दिवाळीला आरोपी किशोर अमृतकर याने पीडित गुंतवणुकदारांना रक्कम परत केली नाही. ते सर्व त्याच्याकडे तगादा लावत होते. तो त्यांची समजूत घालत होता. अचानक १५ दिवसांपूर्वी कुटुंबीयांसह तो फरार झाला. त्याच्या घराला कुलूप लागल्याची माहिती परिसरात पसरली. नागरिकांची प्रचंड गर्दी केली. काही गुंतवणूकदार नंदनवन पोलीस ठाण्यात पोहोचले. पोलिसांनी फिर्यादीच्या तक्रारीवरून किशोर विरूध्द गुन्हा नोंदविला आहे.

कोट्यवधींची रक्कम गुंतवली कुठे?

किशोरला पत्नी आणि एक लहान मुलगा आहे. त्याचे दुमजली घर आहे. तो किराणा दुकान चालवितो. लोकांकडून घेतलेली रक्कम कुठे गुंतवत होता याबद्दल नागरिकांना माहित नाही. मात्र, तो वेळेवर पैसे देत असल्याने लोक त्याच्याकडे जुळत गेले. त्याने कोट्यवधीची रक्कम असल्याने तो एखाद्या संस्थेत किंवा बँक खात्यात जमा करीत असावा अशी शक्यता वर्तविण्यात येते. तसेच शेअर मार्केटमध्ये त्याने पैसा गुंतवला असल्याची शक्यता आहे. त्या दिशेने पोलीस तपास करीत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Person took 1 85 crores and absconded with his family after luring investors with interest adk 83 sud 02