राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पीएच.डी. पात्रता परीक्षेसाठी (पेट) २४ सप्टेंबरपर्यंत झालेल्या नोंदणीत यंदा सर्वाधिक ४ हजार ८८४ विद्यार्थ्यांनी अर्ज केले. यामध्ये सर्वाधिक २ हजार ३४ अर्ज विज्ञान व तंत्रज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी केले आहे. या उमेदवारांची परीक्षा ९ ते १२ नोव्हेंबरदरम्यान घेण्यात येईल.
हेही वाचा >>>नागपूर : दोनपेक्षा अधिक श्वान पाळण्यावर कारवाईचे धोरण थंडबस्त्यात, शहरात भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढला
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ‘पेट’ परीक्षेसाठी सातशेपेक्षा अधिक अर्ज आले आहेत. विशेष म्हणजे, यावर्षी ६६ विषयांसाठी पात्रता परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यात सर्वाधिक ३२ विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखेतील असून वाणिज्य व व्यवस्थापन शाखेत ४, मानव्यशास्त्र शाखेत २५ आणि आंतरशाखीय शाखेत ५ विषयांचा समावेश आहे. दिवाळीमुळे यंदा विद्यार्थ्यांनी परीक्षेची तारीख वाढवून देण्याची मागणी केली होती. त्यामुळे विद्यापीठाद्वारे परीक्षेच्या तारखेमध्ये वाढ करीत ९ ते १२ नोव्हेंबरदरम्यान प्रवेश पात्रता परीक्षा घेण्यात येणार आहे. तर परीक्षेनंतर २२ नोव्हेंबरला निकाल जाहीर केला जाणार आहे.