नागपूर : केंद्र व राज्य शासन बेघरांसाठी विविध योजना राबवत असल्याचा दावा करते, परंतु, नागपुरातील मेडिकल, मेयो या दोन्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रोकमुक्त झालेले, पण निवारा नसल्याने अनेक जण शासकीय रुग्णालयांतील रुग्णशय्येवरच दिवस काढत आहेत. या रुग्णांना घेण्यास वृद्धाश्रमही टाळाटाळ करत असल्याने मेडिकल प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.

मेडिकलच्या वार्ड क्रमांक ३५ मध्ये एक सुमारे ६५ ते ७० वर्षे वयोगटाचा एक वृद्ध उपचार घेत आहे. त्याला अत्यवस्थ अवस्थेत अनोखळी व्यक्तीकडून मेडिकलला दाखल केले गेले. बराच काळ रुग्णावर उपचार झाले. त्यासाठी मेडिकलच्या समाजसेवा विभागाकडून मदत करण्यात आली. सुमारे दोन महिन्यांपूर्वी तो आजारातून मुक्त झाल्याचे औषधशास्त्राच्या डॉक्टरांनी सांगितले. या रुग्णाला चालता येत नसून तो रुग्णशय्येवरच (खाटेवर) आहे. त्यामुळे मेडिकलच्या समाजसेवा विभागाकडून या रुग्णासाठी विविध वृद्धाश्रमात संपर्क केला गेला. परंतु, अद्यापही त्याला निवारा उपलब्ध झाला नाही. त्यामुळे हा रुग्ण मेडिकलच्या वॉर्डातच आहे.

हे ही वाचा… राहुल गांधींना भाजप घाबरते का ? कॉंग्रेसचा सवाल, नागपुरात आंदोलन

मेडिकलच्या वार्ड क्रमांक ४४ मध्ये दुसरी रुग्ण आहे. ही ६० वर्षीय वृद्धेला एमडीआर क्षयरोग असल्याने उपचारासाठी मेडिकलला आली होती. तिच्यासोबत कुणीही नव्हते. क्षयरोग विभागात यशस्वी उपचारानंतर तिला अनेक महिन्यांपासून घरी आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. परंतु, वृद्धाश्रमात जागा मिळत नसल्याने समाजसेवा विभागाकडून ती बरी होईस्तोवर तिला कोण आसरा देईल, म्हणून प्रथम डॉक्टरांना विनंती केली. त्यानंतर आता ही वृद्धा पूर्णपने बरी झाली आहे. काही दिवसांपूर्वी तिचा क्षयरोगचा अहवाल नकारात्मक आला. त्यामुळे तिच्यासाठी निवाऱ्याची शोधाशोध सुरू झाली. तिलाही चालता येत नसल्याने वृद्धाश्रमांकडून घेण्यास नकार दिला जात आहे. मेयो व मेडिकलच्या इतरही काही वार्डात रुग्ण असण्याची शक्यता नकारता येत नाही. त्यामुळे बेघर असलेल्या व चालता न येणाऱ्या रुग्णांचा नागपुरात वाली कोण? हा प्रश्न अनुत्तरीत आहे.

हे ही वाचा… रंग नारंगी, डब्बे १६ अन् बरेच काही,’वंदे भारत’ धावण्यास सज्ज

वृद्धाश्रम चालता न येणाऱ्या रुग्णांना का टाळतात? वृद्धाश्रमांकडून मेडिकल, मेयोतील चालता येत नसलेल्या रुग्णांना घेण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्याबाबत मेडिकलच्या काही अधिकाऱ्यांनी संबंधित वृद्धाश्रमांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी चालता न येणाऱ्या वृद्धांची अधिक काळजी घ्यावी लागते. त्यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता भासते, ते नसल्याने असे वृद्ध घेण्यास टाळले जाते. चालता येणाऱ्यांना या आश्रमात दोन वेळचे जेवण, कपडे यासह इतर सोय केली जाते., असे सांगण्यात आले.

Story img Loader