नागपूर : राष्ट्रीय हरित न्यायाधीकरणाने वायू प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी यंत्राच्या कार्यक्षमतेचे परीक्षण करण्याचे निर्देश मागणाऱ्या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. न्यायाधीकरणाची भूमिका पर्यावरणाच्या महत्त्वपूर्ण प्रश्नांवर निर्णय घेण्याची आहे. व्यावसायिक उपक्रमांच्या उपकरणांची चाचणी घेण्याची नाही, असे न्यायाधीकरणाचे अध्यक्ष न्या. ए.के. गोयल यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठाने सांगितले. सुनावणीनंतर या याचिकेचीच चर्चा होती.

याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यानुसार ते वायू प्रदूषण नियंत्रण या विषयातील तज्ज्ञ आहेत आणि त्यांनी वायू प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी उपकरणाचा शोध लावला आहे. त्यामुळे त्यांनी अर्जदाराच्या उपकरणांचे परीक्षण आणि कार्यक्षमता तपासण्यासाठी दिशानिर्देश मागितले आहे. न्यायमूर्ती सुधीर अग्रवाल यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने सांगितले की, ‘आम्ही अशा अर्जावर विचार करण्यास असमर्थ आहोत. न्यायाधीकरणाची भूमिका पर्यावरणाच्या महत्त्वपूर्ण प्रश्नांवर निर्णय घेणे आहे आणि व्यावसायिक उपक्रमांच्या उपकरणांची चाचणी घेणे नाही.’

मिर्झा मोहम्मद आरिफ यांनी ही याचिका दाखल केली होती. त्यांच्या याचिकेवर सुनावणी सुरू होती. हवेचे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी शोधलेल्या उपकरणाचे परीक्षण आणि कार्यक्षमतेचे परीक्षण करण्याचे निर्देश आरिफ यांनी मागितले होते. तसेच, यंत्राच्या कार्यक्षमतेचे परीक्षण करण्यासाठी ‘नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी- कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च’कडे निर्देश मागितले. मात्र, न्यायाधीकरणानेच या याचिकेवर सुनावणीस नकार दिला.

Story img Loader