अमरावती : जिल्ह्यात उष्णतेच्‍या झळा आता जाणवू लागल्‍या असून, उष्माघाताचा धोका असल्याने त्याचा मुकाबला करण्यासाठी पशुसंवर्धन विभागही सज्ज झाला आहे. केवळ मनुष्यांना उष्माघाताचा धोका आहे असे नव्हे, तर जनावरांनाही उष्माघाताचा फटका बसू शकतो. काही दिवसांपूर्वी झालेल्‍या अवकाळी पावसामुळे वातावरणातील बदल आणि आता उन्‍हाची तीव्रता यामुळे जनावरांना विविध आजारदेखील उद्धभवू शकतात. त्यामुळे जनावरांची काळजी घेणे आता क्रमप्राप्त झाले आहे.

जिल्ह्यात सुमारे ४ लाख‎ ५० हजार इतके पशुधन‎ आहे. उन्हाच्या झळांनी पशूनांही‎ धोका निर्माण होतो. त्यामुळे‎ पशुपालकांनी काळजी घ्यावी, असे‎ आवाहनही पशुसंवर्धन विभागाने केले‎ आहे.‎ एप्रिल, मे महिन्यात तापमान हे ३५‎ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्यास‎ त्यांचा विपरीत परिणाम हा गायी,‎ म्हशींच्या आरोग्य, कार्यक्षमता,‎ प्रजनन व उत्पादकतेवर होऊ शकतो.‎ उन्हाळ्यामध्ये वातावरणातील‎ तापमानामुळे जनावरांच्या शरीराद्वारे ‎ वातावरणातील जास्त उष्णता शोषल्यामुळे किंवा शरीरातील‎ उष्णता उत्सर्जित करण्याच्या‎ प्रक्रियेमध्ये बाधा निर्माण झाल्यास‎ किंवा शरीरामध्ये अतिरिक्त उष्णता ‎निर्माण झाल्यास त्याच्या शरीरात या ‎वाढलेल्या तापमानामुळे ताण येतो. त्यांचे शारीरिक तापमान वाढते. जनावरांची ‎तापमान नियंत्रण करण्याची शारीरिक ‎सहन क्षमता कमी पडल्यास‎ शारीरिक तापमानात वाढ होते. एका ‎जागी उभे राहणे, बैचेन होणे, खाली ‎बसणे अशी लक्षणे दिसून येतात. ‎यालाच उष्माघात म्हणतात. वेळीच ‎उपचार न केल्यास जनावरेही उष्माघातास बळी पडतात. या‎ अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या‎ पशुसंवर्धन विभागाने काही ‎खबरदारीच्या सूचना‎ पशुपालकांना दिल्या आहेत.‎

sixth mass extinction earth currently experiencing a sixth mass extinction
पृथ्वीवरील बहुतेक जीवसृष्टी नष्ट होण्याच्या मार्गावर? काय सांगतो ‘सहाव्या महाविलोपना’चा सिद्धान्त?
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
chaturang article
‘भय’भूती : भयातून अभयाकडे
Uran, air pollution Uran,temperature, humidity Uran,
हवा प्रदूषणाचा मुद्दा निवडणुकीतून गायब? उरणमधील वाढते हवा प्रदूषण, तापमान आणि आर्द्रतेचा नागरिकांच्या शरीरावर परिणाम
lead in turmeric FSSAI
तुमच्या आहारातील हळद विषारी आहे का? संशोधनात हळदीत आढळून आली ‘या’ हानिकारक धातूची भेसळ
flat Palava Colony animals, Dombivli Palava Colony animals, Dombivli flat animals
डोंबिवली पलावा वसाहतीमधील अलिशान सदनिकेतून विदेशी वन्यजीव जप्त, ठाणे वन विभागाची कारवाई
Eknath Shinde, Eknath Shinde news, Jitendra Awhad latest news,
ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या नावाने करोडोंची वसुली, आमदार जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप

हेही वाचा – अमरावती विद्यापीठातील विविध पदांच्या भरतीची दिशाभूल करणारी जाहिरात समाज माध्‍यमांवर

सकाळी व संध्याकाळी ऊन कमी‎ असताना जनावरे चरण्यास‎ सोडावीत. मुबलक प्रमाणात थंड‎ पिण्याचे पाणी द्यावे. बैलांकडून‎ शेतीच्या मशागतीची कामे शक्यतो‎ सकाळी व संध्याकाळी कमी उन्हात‎ करून घ्यावीत. अनेकदा जागेअभावी‎ किंवा अन्य कारणाने जनावरे‎ दुपारच्या वेळी भर उन्हात बांधली‎ जातात. याचा परिणाम त्यांच्या‎ आरोग्यावर होतो. त्यांना उन्हाचा‎ चटका बसू नये यासाठी पशुपालकांनी‎ जनावरांची काळजी घ्यावी, असा सल्‍ला पशूवैद्यकांनी दिला आहे.