लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : आजच्या आधुनिक जगात सर्व गोष्टी मोबाईल फोनशी इतक्या जुळलेल्या आहेत की, मोबाईल फोनशिवाय एकही काम पूर्ण होत नाही. कुणाशी फोनच्या माध्यमातून संपर्क न होणे ही हतबल करणारी स्थिती असते. असाच काहीसा अनुभव रविवारी नागपूरकरांना आला.

नागपूरकरांना फोन करण्यात अडचणी निर्माण होत असल्याची तक्रारी शहराच्या विविध भागातून येत होत्या. विशेषत: जिओ दूरसंचार कंपनीचे ग्राहक असलेल्याना या त्रासाचा अधिक सामना करावा लागला. याशिवाय मोबाईल फोनच्या माध्यमातून युपीआय पेमेंट करताना देखील अनेक अडचणी येत असल्याचे दिसून आले.

आणखी वाचा-नागपूरमध्ये ईव्हीएम तपासणीसाठी या उमेदवारांने भरले तीन लाख रुपये

फोन कसा लावायचा?

नागपूरकरांसाठी रविवारची सायंकाळ त्रासदायक ठरली . दुपारी चारनंतर मोठ्या प्रमाणात कॉल ड्रॉपच्या तक्रारी सर्वत्र नागरिकांकडून केल्या जात होत्या. फोन लावल्यावर बीप या ध्वनीसह फोन बंद होत आहेत. शहरात प्रामुख्याने व्होडाफोन-आयडिया, एअरटेल, जिओ या दूरसंचार कंपनीचे ग्राहक आहेत. मोबाईल नेटवर्कमध्ये समस्या येत असल्याने नागपूरकरांना एकमेकांना फोन लावण्यात अडचणींचा सामना करावा लागत आहे. सुरुवातीला ही समस्या व्यक्तिगत असल्याचे समजून अनेकांनी याकडे दुर्लक्ष केले. मात्र फार वेळपर्यंत अशीच समस्या होत असल्याने नागरिकांनी तक्रार करायला सुरुवात केली. जिओच्या वापरकर्त्यांकडून अशाप्रकारची तक्रार जास्त प्रमाणात झाली असल्याची माहिती आहे. याबाबत जिओच्या कस्टमर केअरशी संपर्क साधल्यावर ग्राहकांना फोनमध्ये व्यक्तिगत समस्या असल्याचे उत्तर देण्यात येत आहे. सायंकाळी उशीरापर्यंत ही समस्या कायम होती.

आणखी वाचा-काँग्रेस नेते सुनील केदार म्हणाले, “भाजप नेत्यांनी ‘ते’ पुस्तक वाचावे…”

पेट्रोलपंपावर पेमेंटमध्ये अडचणी

फोनच्या नेटवर्कमध्ये समस्येसह नागपूरकरांना आणखी एका समस्येला सामोरे जावे लागले. आजच्या आधुनिक युगात बहुतांश लोक रोख व्यवहार करण्याऐवजी ऑनलाईन पेमेंटवर भर देतात. शासनही डिजिटल व्यवहार करण्याला प्रोत्साहन देत आहे. मात्र रविवारी ऑनलाईन युपीआय पेमेंट करणाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागला. शहरातील विविध पेट्रोल पंपांवर इंधन भरण्यासाठी गेलेल्या अनेक नागरिकांना ऑनलाईन पेमेंट बंद असल्याचे कारण देत परत पाठविण्यात आले. केवळ रोख रक्कम देणाऱ्यांना इंधन उपलब्ध करून दिले जात होते. शंकरनगर चौकातील एका पेट्रोल पंपावर कार्यरत कर्मचाऱ्यांने याबाबत माहिती देताना सांगितले की दुपारपासूनच ऑनलाईन पेमेंट करण्यात अडचणी येत असल्याने पेट्रोलपंपवर ऑनलाईनची सुविधा तात्पुरती बंद करण्यात आली. केवळ रोख रक्कम किंवा कार्डने पैसे देणाऱ्यांना पेट्रोल उपलब्ध करून दिले जात आहे. ऑनलाईन पेमेंटच्या समस्येमुळे अनेक ग्राहक पेट्रोलविना निराश होऊन परत जाताना दिसले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Phones were not working and online payments were not possible either in nagpur tpd 96 mrj