वर्धा : लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली. परिणामी आचारसंहिता अंमलात आली. त्यामुळे निवडणूक यंत्रनेने सार्वजनिक ठिकाणी असलेले राजकीय पक्ष तसेच नेते व अनुषंगिक फोटो साहित्य हटविणे सुरू केले. मात्र खतांच्या बॅगा अपवाद कश्या, असा सवाल केला जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर डिएपी खातांचा साठा गावोगावी येत आहेत. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो आहे. तसेच प्रधानमंत्री भारतीय जन उर्वरक परियोजना असे नाव आहे. ही योजना म्हणजे एक आमिष असून त्यामुळे मतदार बंधूंवर त्याचा प्रभाव पडतो. कारखाना, वितरक, किरकोळ विक्रेते, शेतकरी हे सर्व घटक मतदार आहेत. त्यांच्यावर प्रभाव पाडणे अनुचित नाही का, असा सवाल काँग्रेसच्या किसान मोर्चाचे समन्वयक शैलेश अग्रवाल यांनी केला आहे.

हेही वाचा – मंत्री सुधीर मुनगंटीवारांकडे केवळ ९० हजार रुपये रोख, बंगल्याची किंमत ५ कोटी ६० लाख, चारचाकी वाहन नाही…

हेही वाचा – सांगलीत हळद दराचा पुन्हा विक्रम

हेही वाचा – रायगडमध्ये सुनील तटकरेंना उमेदवारी, भाजपमध्ये निराशा

गावात जाण्यापूर्वीच या बॅगवरील फोटो स्टिकरने झाकणे क्रम प्राप्त ठरत होते. आता ते तुम्ही केव्हा व कसे झाकणार, अशी शंका आहे. त्यामुळे हा आदर्श आचारसंहिता उल्लंघन करण्याचा प्रकार ठरतो. त्याबद्दल भाजपवर गुन्हा दाखल होणे अपेक्षित आहे. आज आपण केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तशी तक्रार करणार, असे अग्रवाल यांनी स्पष्ट केले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Photo of pm modi on fertilizer bag as a breach of code of conduct pmd 64 ssb