गोंदिया : अर्जुनी मोरगावचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी आपल्या संपूर्ण मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शुभेच्छा देणारे फलक लावले आहेत. या फलकांवर राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांचा फोटो असल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या हकालपट्टी विरुद्ध हकालपट्टी सुरू असतानाच येथे झळकलेले फलक पाहून सर्वांचे डोळे विस्फारले आहेत. अजित पवारांच्या बंडामागे आणि सध्याच्या राजकीय घडामोडींमागे शरद पवारच तर नाही ना, अशी प्रश्नवजा चर्चा सुरू आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुख्यमंत्री शिंदे बाळासाहेबांचा फोटो लावतात, मी शरद पवारांचा वापरला – चंद्रिकापुरे

वरिष्ठ पातळीवर काहीही घडत असले तरी आजघडीला शरद पवार हेच आमचे वरिष्ठ नेते व आदर्श आहेत. यामुळे अजित पवार यांना दिलेल्या शुभेच्छा फलकावर शरद पवार यांचा फोटो लावला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाळासाहेबांचा फोटो लावतात, मी शरद पवारांचा वापरला आहे. उद्या बैठकीत काय घडते किंवा या महाभारताचे उद्या काय परिणाम होतात, त्यानुसार पुढील निर्णय घेऊ, असे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी ‘लोकसत्ता’सोबत बोलताना सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Photo of sharad pawar on the greeting boards of deputy chief minister ajit pawar gondiya sar 75 amy
Show comments