बुलढाणा : तालुक्यातील देऊळघाट बस थांबाजवळच्या मुख्य मार्गावरील ‘फोटोफास्ट स्टुडीओ’ला लागलेल्या आगीत सुमारे ६ लाखांचे साहित्य व उपकरणे खाक झाली. शाॅर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. धिरज अनिल काटेकर (रा.दहिद) यांचा देऊळघाटमध्ये फोटो स्टुडीओ आहे. बुधवारी शाॅर्टसर्किटमुळे दुकानाला आग गली. आगीने रौद्ररूप धारण केल्याने पाहतापहाता दुकानातील अडीच लाखांचा कॅमेरा, दीड लाखांचा शुटींग कॅमेरा, १ लाख ३५ हजार रुपयांचा ड्रोन कॅमेरा व इतर साहित्य, असे सहा लाखांच्यावर साहित्य जळून खाक झाले आहे़. तलाठी कोळसे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Photofast studio on fire 6 lakhs loss scm 61 ysh