नागपूर : उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या पक्षाचे कार्यालय, बजाजनगर येथील वासवी लॉन असेल, असे सांगून पक्षाचे नवनियुक्त प्रदेश प्रवक्ते प्रशांत पवार यांनी आधीपासून लावलेले राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे छायाचित्र काढले. यामध्ये जयंत पाटील, सुप्रिया सुळे, अनिल देशमुख यांच्या छायाचित्राचा समावेश आहे. मात्र, शरद पवार यांचा काढण्यात आला नाही.

बजाजनगर येथील पवार यांच्या कार्यालयातून सुप्रिया सुळे, जयंत पाटील, अनिल देशमुख, दुनेश्वर पेठे यांचे फोटो हटविण्यात आले. नवे फलक बनतील त्यात शरद पवार यांचाही फोटो असेल. पक्षात विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना सहभागी करून घेण्यात येत असून महापालिका निवडणुकीची तयारीही केली जात आहे. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे लवकरच नागपुरात येतील. त्यांच्या हस्ते पक्ष कार्यालयाचे अधिकृत उद्घाटन होईल, असे प्रशांत पवार यावेळी म्हणाले.

The attack on Baba Siddiqui reverberated across the country Mumbai crime news
हत्येनंतर राजकीय वादळ; बाबा सिद्दिकी यांच्यावरील हल्ल्याचे देशभरात पडसाद
18th October 2024 Horoscope In Marathi
१८ ऑक्टोबर पंचांग: नोकरदारांच्या कुंडलीत अच्छे दिन तर…
Harshvardhan Patil in possession of Indapur Congress Bhawan
हर्षवर्धन पाटील यांच्याकडे इंदापूर काँग्रेस भवनाचा ताबा?
Former Tumsar MLA Charan Waghmare joined Sharad Pawar s NCP today in Mumbai
भंडारा : चरण वाघमारे यांच्या हाती राष्ट्रवादीची तुतारी
Jayant Patil, Jayant Patil news, Jayant Patil latest news,
जयंत पाटील यांना घेरण्याचे विरोधकांबरोबरच मित्रपक्षांचेही प्रयत्न
devendra fadnavis reaction on harshwardhan patil about join ncp sharad pawar group
“ही तर जुनी बातमी, त्यात नवीन काय?” फडणवीस कोणाबाबत बोलले?
What Supriya Sule Said About Rohit Pawar ?
Supriya Sule : “रोहित पवार जर मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी शरद पवारांचा वारसा..”, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य चर्चेत
Sharad Pawars big statement about increasing oppression of women
महिलांवरील वाढत्या अत्याचाराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य, म्हणाले…

हेही वाचा – “आम्हाला केवळ तारीख पे तारीख..”, शिंदे गटाच्या आमदारांची प्रतिक्रिया, काय म्हणाले?

प्रशांत पवार यांना विदर्भाचे अजित पवार गटाचे प्रवक्ते बनवण्यात आले आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष बाबा गुजर, सतीश शिंदे, ईश्वर बाळबुधे, अरविंद भाजीपाले, भागेश्वर फेंडर, राजेश माटे आदी उपस्थित होते.