स्वयंघोषित समाज माध्यम विश्लेषक अजित पारसे याने अनेक राजकीय नेते, अभिनेते, अभिनेत्री, संघ-संस्था आणि संघटनांचे पदाधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी, जिल्हाधिकारी, महापालिकेतील अधिकारी यांच्यासह मंत्र्यांसोबतही छायाचित्र काढून ते फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्वीटरवर पोस्ट केले होते. परंतु, पारसेवर गुन्हा दाखल होताच ती सर्व छायाचित्रे अचानक गायब झाली आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>नागपूर : सायबर गुन्ह्यांबाबत आता घरूनच करा तक्रार !

पारसे हा समाज माध्यमावरील फसवणुकीबद्दल जनजागृतीचा आव आणत होता. त्यासाठी तो अनेक चित्रफिती फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पोस्ट करीत होता. यामुळे अनेकांनी त्याला समाजमाध्यमांवर ‘फॉलो’ करणे सुरू केले होते. त्याने नागपुरातील मोठे राजकीय नेते आणि त्यांच्या पत्नींसोबत छायाचित्रे काढून ती समाजमाध्यमांवर पोस्ट केली. तसेच एकाच ॲपचे वेगवेगळ्या नेत्यांच्या हस्ते उद्घाटन करून ती छायाचित्रे फेसबुकवर टाकली. यासोबतच शहरातील मोठमोठी महाविद्यालये, नामांकित शाळेत तो प्रमुख पाहुणा आणि मार्गदर्शक म्हणून मिरवत राहिला. तो अनेकदा पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यालयात पुष्पगुच्छ घेऊन छायाचित्रे काढायचा. पोलीस अधिकाऱ्यांसोबतची अनेक छायाचित्रे पारसने घरात सजवली आहेत. मात्र, गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू होताच पारसेने ती सर्व छायाचित्रे समाजमाध्यमांवरून हटवल्याचे दिसत आहे.

हेही वाचा >>>नागपूर : ‘सीए’ करणाऱ्या विद्यार्थ्याने ६ व्या माळ्यावरून उडी घे‌त संपविले जीवन

चॅटही ‘डिलीट’ केल्याची माहिती
अजित पारसेचे काळे कारनामे उघडकीस येताच त्यावर गुन्हा दाखल झाला. त्यामुळे अनेकांनी त्याला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर अनफ्रेंड केले. शहरातील अनेक विवाहित महिला आणि तरुणींचे त्याने अश्लील छायाचित्र काढल्याचे उघडकीस येताच अनेक महिलांनीही त्याचा ऑनलाईन नाद सोडला. तसेच अनेकांनी त्याच्याशी केलेल्या चॅटही ‘डिलीट’ केल्याची माहिती समोर येत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Photos posted by ajit parse deleted from social media amy