नागपूरमध्ये एका विवाहीत महिलेचा तिच्या फेसबूकवरील मित्रानेच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. विशेष म्हणजे आरोपीने पीडित महिलेला तिचे अश्लील छायाचित्र व्हायरल करण्याचीही धमकी दिली. अखेर पीडित महिलेने पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. यानंतर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. रजत मेघराज राणा (२८, गिट्टीखदान) असे आरोपीचे नाव आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पीडित महिला पतीसोबत पटत नसल्यामुळे माहेरी राहायला आली होती. या काळात तिची फेसबुकवरून एका युवकाशी ओळख झाली. त्याने तिला आधार देत जाळ्यात ओढले. तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करीत तिचे अश्लील फोटो काढले. अखेर पीडितेने त्याच्या वारंवार अत्याचाराला कंटाळून पोलिसांत तक्रार केली. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विवाहिता २८ वर्षांची आहे. चार वर्षांपूर्वी तिचे लग्न झाले. तिला एक मुलगा आहे. मात्र, पती दारू पिण्याच्या सवयीचा असल्यामुळे क्षुल्लक कारणावरून त्यांच्यात खटके उडायचे. सततच्या वादाला ती कंटाळली आणि तिने पतीचे घर सोडण्याचा निर्णय घेतला. ती माहेरी राहू लागली. तिची फेसबुकवर आरोपी रजत राणा या युवकाशी ओळख झाली. ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. त्याच्यावर विश्वास ठेवून तिने संपूर्ण व्यथा त्याला सांगितली.
दोघांच्या भेटी व्हायला लागल्या. दरम्यान आरोपीने गैरफायदा घेत पीडितेशी शारीरिक संबध प्रस्थापित केले. आरोपी पीडितेवर वारंवार लैंगिक अत्याचार करीत होता. तिला नोकरी लावून देण्याचे आमिष देत होता. त्याच्या आमिषाला ती बळी पडली. त्याने तिचे काही अश्लील छायाचित्र आणि चित्रफितीही काढल्या. त्या समाजमाध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देऊन शारीरिक संबंधासाठी मागणी करीत होता. त्यामुळे कंटाळून महिलेने गिट्टीखदान पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. घटनेची गंभीरता लक्षात घेता पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली. न्यायालयाने आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
पती नांदवायला झाला राजी
जवळपास एक वर्ष पतीपासून दूर राहिल्यानंतर पतीने संसार पुन्हा फुलविण्यासाठी दारू सोडली आणि कामधंद्याला लागला. त्यामुळे त्याने पुढाकार घेऊन सासरी फोन करून पत्नीला नांदवायला तयार असल्याचे सांगितले. पीडितेचे पतीसोबत संबध सुधारले. दोघांनीही एकमेकांना माफ केले. त्यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला.
यानंतर पीडितेने आरोपी रजतशी संबंध तोडण्याचा प्रयत्न केला. परंतु, आरोपीला चटक लागल्याने त्याने पीडितेचा पिच्छा सोडला नाही. आरोपी शेवटची भेट म्हणून पीडितेला एका हॉटेलमध्ये घेवून गेला आणि पुन्हा लैंगिक अत्याचार केला. पतीसोबत नांदायला गेल्यास अश्लील छायाचित्र व्हायरल करण्याची धमकीही दिली. यानंतर पीडितेने तक्रार केली आणि पोलिसांनी तातडीने आरोपीला अटक केली.