बुलढाणा: चॉकलेटचे आमिष दाखवून अडिच वर्षीय बलिकेवर शारीरिक अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना तरवाडी (तालुका नांदुरा) येथे घडली. यावेळी नराधमाने तिच्यावर दगड टाकून ठार मारण्याचा प्रयत्नही केला. पीडित बालिकेला उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले.

हेही वाचा – गडचिरोली : नक्षलवाद्यांकडून गाव पाटलाची गोळ्या झाडून हत्या; सुरजागड लोहखाणीचे समर्थन केल्याचा पत्रकातून आरोप

हेही वाचा – नागपूर : फळ व्यापाऱ्याची १५ लाखांनी फसवणूक

प्राप्त प्राथमिक माहितीनुसार नांदुरा तालुक्यातील तरवाडी येथे चॉकलेटचे आमिष दाखवून अडीच वर्षीय बालिकेवर १७ वर्षीय बालकाने अत्याचार केला. कुकर्म करून बालिकेला डोक्यात दगड घालून ठार मारण्याचा प्रयत्नही केल्याने ती गंभीर जखमी झाली. तिला अत्यावस्थतेत प्रारंभी बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. तिथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारसाठी अकोला जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. आरोपीला बोरखेडी पोलिसांनी ताब्यात घेतल.

Story img Loader