वर्धा : वर्धा जिल्ह्यातील चारही मतदारसंघातील लढतीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे.महा आघाडी विरुद्ध महायुती असा सामना असून मनसे, शिंदे व ठाकरे सेना, राष्ट्रवादी अजित पवार गट यांची रिंगणात हजेरी लागलेली नाही. वर्धा मतदारसंघात काँग्रेसचे शेखर प्रमोद शेंडे विरुद्ध भाजपचे विद्यमान आमदार डॉ. पंकज भोयर विरुद्ध आप समर्थीत अपक्ष उमेदवार डॉ. सचिन पावडे असा तिहेरी सामना रंगणार. डॉ. पावडे यांनी काँग्रेस तिकीट मिळावे म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत जोरदार प्रयत्न केले होते. भारत जोडो अभियानाचे कर्तेधर्ते त्यांच्यासाठी जोर लावून होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पण पक्षनिष्ठा व जातीय समीकरण यात शेंडे बाजी मारून गेले. काँग्रेसने एक चांगला चेहरा म्हणून चर्चित असलेल्यास नाकारले, अशी सहानुभूती तसेच इंडिया अलायन्सचे काही शिलेदार सोबत घेत अपक्ष म्हणून उडी घेतली आहे. ते लढतीत येणार कां, हे पुढील दिवसात स्पष्ट होईल. शेखर शेंडे हे चौथी संधी पक्षाने दिल्याने सर्व तो जोर लावून आहेत. विद्यमान आमदार डॉ. भोयर हे माझ्यापुढे आव्हानच नसल्याचा आत्मविश्वास बाळगून मैदानात उतरले आहे. हिंगणघाट येथे भाजपचे विद्यमान आमदार समीर कुणावार विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अतुल वांदिले असा थेट सामना आहे. वांदिले यांच्याच पक्षाचे माजी आमदार राजू तिमांडे हे आहेतच. ते यापूर्वी अपक्ष व पक्षातर्फे पाचवेळा लढून चुकले असून मतदारांनी त्यांना एकदाच स्वीकारल्याचा इतिहास आहे.

हेही वाचा…वर्धा : वृत्त वाहिनीच्या कार्यक्रमात राडा; भाजप नेत्यांना धक्काबुक्की, पोलीस ठाण्यात शेकडोंचा जमाव

u

आर्वीत खरा सामना रंगणार. देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सुमित वांकखेडे विरुद्ध खासदार पत्नी मयुरा अमर काळे अशी थेट भिडंट होणार. जिल्ह्यातील हा सर्वात लक्षवेधी सामना होत असून राज्यभराचे ईथे लक्ष लागले आहे. केचे बंडखोरी टळल्याने वानखेडे आश्वस्त झाले आहे. तर खासदार काळे हे माझा सामना थेट फडणवीस यांच्याशीच असल्याचे सांगत सहानुभूतीचा डाव टाकून बसले आहे. देवळी येथे डबल हॅट ट्रिक साधण्यासाठी काँग्रेसचे विद्यमान आमदार रणजित कांबळे सज्ज आहेत. मात्र ही जागा भाजप नेत्यांनी प्रथमच मनावर घेत राजेश बकाने यांना रिंगणात टाकले. अपक्ष किरण ठाकरे आहेच.देवळी जागा आम्हीच लढविणार, असा निर्धार करीत शिंदे गटाकडून हिसकावून घेण्यात आली. गत निवडणुकीत बकाने हे अपक्ष उभे राहून दुसऱ्या क्रमांकावर तर सेनेचे तिसऱ्या स्थानी गेले होते. माजी खासदार रामदास तडस यांचा गड समजल्या जाणाऱ्या देवळीत त्यांची साथ महत्वाची ठरेल. भाजपचा १०० यशाचा निर्धार आहे. तो देवळी काबीज केल्याखेरीज पूर्ण होणार नसल्याचे इथेच पक्षनेते लक्ष ठेवून आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Picture of contest in all four constituencies of wardha district is now clear pmd 64 sud 02