प्रकट दिनानिमित्त विदर्भ पंढरी शेगावात लाखावर भक्त दाखल झाले असतानाच तिघा जणांकडून एक पिस्तूल व चार जीवंत काडतुस जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे सुरक्षा यंत्रणा अधिकच अलर्ट झाल्या आहेत. हा घातपाताचा डाव तर नाही ना, अशी चर्चा पंचक्रोशीत सुरू आहे.

हेही वाचा- बाळासाहेबांची शिवसेनेत अंतर्गत कलह, विकास निधीवरून पदाधिकाऱ्यांमध्ये जुंपली; वाचा कुठे ते…

atul subhash
Atul Subhash Suicide Case : अतुल सुभाषच्या सासू आणि मेव्हण्याने केलं पलायन; पोलीस म्हणतात, “त्यांना नजरकैदेत…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Two youths attacked with a koyta in Khadki crime news Pune news
पुणे: खडकीत दोघा तरुणांवर कोयत्याने वार
BJP workers request party seniors that Abdul Sattar should not be minister again
काहीही करा पण मंत्रीपदी सत्तार नको, भाजप कार्यकर्त्यांचे साकडे
Bajrang Sonwane meets Amit Shah
“बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सीआयडी चौकशी व्हावी”; शरद पवारांचा खासदार थेट अमित शाहांना भेटला
Muramba
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
nana patole
पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजेच ‘ऑपरेशन लोटस’,पटोलेंचा घणाघात
Satish Wagh murder case, Pune police, Pune ,
सतीश वाघ हत्या प्रकरण : नवनाथ गुरसाळे आणि पवन शर्मा दोन आरोपींना अटक अन्य आरोपींचा शोध सुरू

शेगावात प्रकट दिनानिमित्त श्रींचे मंदिर दर्शनासाठी रात्रभर सुरू असल्याने तोबा गर्दी उसळली आहे. अशातच, रविवारी रात्री शेगाव-वरवट मार्गावरील बुरुंगले विद्यालयाजवळ तैनात पोलिसांनी एक मोटारसायकल अडविली. वाहन चालकासह तिघांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ एक पिस्तूल, ४ जीवंत काडतुसे, ३ मोबाईल आढळून आले. पोलिसांनी पिस्तूल आणि दुचाकी जप्त केली.

हेही वाचा- “हिंदी भाषेविषयी राग नाही, पण त्याच भाषेतून बोलण्याची जबरदस्ती केली तर..”; डॉ. आर. बालसुब्रमण्यम यांनी व्यक्त केली नाराजी

स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने ही कारवाई केली. प्राथमिक तपासात आरोपी हे मध्यप्रदेशच्या सिमेवरील संग्रामपूर तालुक्यातील पातूरडा ( जि. बुलढाणा) येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले आहे. शेख अकबर शेख हरुन ( २१), जीवन तेजराव गाडे (१८) अशी दोघा आरोपींची नावे असून एक आरोपी अल्पवयीन आहे. आरोपींनी हे पिस्तूल आणि काडतूस शेगावात विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली, अशी माहिती सूत्रांनी दिली. यामुळे यंत्रणांनी तूर्तास सुटकेचा श्वास घेतला असला तरी प्रकट दिनाचा मुहूर्त लक्षात घेता यंत्रणा जास्तच दक्ष झाल्या आहेत.

Story img Loader