Pitru Paksha 2023 All Date, Rituals and Significance : अनंत चतुर्दशीच्या पोर्णिमेनंतरच्या दुसऱ्या दिवशी भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्ष सुरु होतो. भाद्रपद कृष्ण प्रतिपदेपासून भाद्रपद अमावस्येपर्यंतच्या काळाला पितृपक्ष किंवा पितृ पंधरवडा म्हणतात. यंदा पितृपक्ष २९ सप्टेंबर २०२३ पासून १४ ऑक्टोबर या कालावधीत आहे. या काळात पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राध्द, महालय आदिविधी केले जातात. पितृपक्षात केलेल्या तर्पणामुळे पूर्वजांचा आशिर्वाद मिळतो आणि घरात कायम सुख-शांती नांदते, असे मानले जाते.

पूर्वजांच्या मृत्यूची जी तिथी असेल, त्या तिथीला पितृपक्षात त्यांच श्राध्द केल जात. त्याला महालय असं म्हणतात. ज्यांच्या मृत्यूची तिथी माहिती नसते किंवा त्या तिथीला महालय करणे शक्य होत नाही त्यांचा महालय सर्वपित्री अमावस्येला (भाद्रपद अमावस्या) केला जातो. पूर्ण पितृ पंधरवाड्यात महालय करणं शक्य झाले नाही तर पंचागात दिलेल्या महालय समाप्तीच्या कालावधीपर्यंत महालय श्राध्द करता येते. महालय श्राध्द म्हणजे अशी एक पध्दत आहे की त्यातून पूर्वजांना सांगीतल जातं, की ते आजही परिवाराचा अविभाज्य घटक आहेत.

akshay kumar share update on phir hera pheri 3
‘हेरा फेरी ३’ची प्रतीक्षा संपली, अक्षय कुमारने दिली महत्त्वाची माहिती; म्हणाला, “पुढील वर्षी…”
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Prithviraj Chavan campaign in Karad, Prithviraj Chavan,
सत्ता आल्यावर कराड जिल्हा करणार – पृथ्वीराज चव्हाण
shani rash parivartan 2025 shani guru transit change luck of these zodiac
Shani Rashi Parivartan 2025: नववर्षात शनि-गुरु बदलणार चाल, ‘या’ राशीच्या लोकांच्या नशिबाचे दार उघडणार, नोकरीसह मिळणार पैसाच पैसा
Guru Nakshatra Gochar 2024
२८ नोव्हेंबरला गुरु बदलणार आपली चाल! ‘या’ राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणार आनंद, मिळेल अपार धन
Shani gochar 2025
पुढील १३४ दिवसांचा काळ कमावणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार प्रत्येक कामात यश
preliminary round of loksatta lokankika one act play competition
 ‘लोकसत्ता लोकांकिका’ची पहिली घंटा; प्राथमिक फेरी ३० नोव्हेंबरपासून; मुंबईत २१ डिसेंबरला महाअंतिम फेरी

हेही वाचा : ट्रक ड्रायव्हरचा मुलगा निघाला लंडनला, बल्लारपूरच्या ध्येयवेड्या जयची सातासमुद्रापार शिक्षणवाट

पितृपक्षाचे महत्त्व

श्राध्द झालं नाही, तर आत्म्याला पूर्ण मुक्ती मिळत नाही असेही म्हणतात. पितृपक्षात नियमितपणे दानधर्म करण्यामुळे कुंडलीतील पितृदोष दूर होतो, अशी समाजात धारणा आहे. पितृपक्षात श्राध्द आणि तर्पणाचे खास महत्व असते. त्यामुळे पितर प्रसन्न होतात. आणि आशिर्वाद देतात. पूर्वजांच्या कृपेमुळे आपल्या वर्तमान आयुष्यात येणाऱ्या वेगवेगळ्या अडचणी दूर होतात . व्यक्तीला अनेक समस्यांपासून मुक्ती मिळते असे ही आपलेच घरची वडीलधारी मंडळी सांगतात. पितृपक्षात पूर्वजांच स्मरण केलं जातं. त्याला श्राध्द म्हणतात. पिंडदान म्हणजे आपल्या पितरांना खाऊ घालणं. आपण चपाती, भात वगैरे खातो. तसेच पूर्वजांना पिंडाच्या रुपाने भोजन अर्पण केलं जातं. तर्पण दर्भाने केले जाते. त्याचा अर्थ आहे पितरांना पाणी पाजणं, असे सांगण्यात येते. भारतात विविध समाज पितृपक्ष आपापल्या समाजातील पद्धतींप्रमाणे करतात.