नागपूर : घरातमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो लावला याचा अर्थ ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला आहे असे होत नाही, हे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात नोंदविले आहे. न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण आणि न्यायमूर्ती उर्मिला जोशी फाळके यांच्या खंडपीठाने हे मत व्यक्त केले आहे. अमरावती जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने एका १७ वर्षीय मुलीला जात प्रमाणपत्र देण्यास नकार दिला होता. याविरोधात मुलीले उच्च न्यायालयात दाद मागितली.
जात पडताळणी समितीचे सदस्य मुलीच्या घरी गेले असता त्यांना येशू ख्रिस्ती यांची फोटो आढळली. त्यामुळे समितीने निष्कर्ष काढला की मुलीच्या कुटुंबीयांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला आहे आणि मुलीला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट केले. मात्र मुलीच्यावतीने न्यायालयात सांगण्यात आले की येशू ख्रिस्त यांची फोटो तिला भेटवस्तू म्हणून देण्यात आली होती आणि आजही तिचे कुटुंब बौद्ध धर्मातील रितींचे पालन करतात. फोटो लावल्याने धर्म परिवर्तन होते ही गोष्ट कुठलाही विवेकशील व्यक्ती स्वीकारणार नाही, असे मत न्यायालयाने नोंदविले.