नागपूर : मध्य नागपुरातील गांधीबाग उद्यानाला लागून असलेल्या सोक्ता भवनाच्या जागेवर नागपूर महापालिकेकडून व्यवसायीक संकुल उभारून हे उद्यानच विकण्याचा घाट रचल्याचा गांधीबाग उद्यान बचाव संघर्ष समितीचा आरोप आहे. समितीकडून उद्यान वाचवण्यासाठी विविध पद्धतीने आंदोलनही सुरू झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहरातील सर्वाधिक दाटीवाटीने असलेल्या मध्य नागपुरातील गांधीबाग उद्यानात रोजच सकाळी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंतच्या वयोगटातीलन नागरिकांची गर्दी असते. येथे सगळ्याच वयोगटातील नागरिक नित्याने निरोगी राहण्यासाठी व्यायाम, योगा, ध्यान-साधनासह विविध उपक्रम राबवताना दिसतात. तर येथील हिरवळीचा आनंद अनेक पर्यावरणप्रेमी नित्याने घेतात.

हेही वाचा – नरसिंह राव यांना ‘भारत रत्न’, रामटेक पुन्हा चर्चेत, काय आहे कारण?

नागरिकांची गर्दी व या उद्यानाबद्दलचे प्रेम बघता नागपूर महापालिकेकडून या उद्यानावर नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करणे अपेक्षित आहे. परंतु याउलट होत असून या उद्यानाला लागून असलेल्या सोक्ता भवनाच्या जागेवर प्रशासन आता व्यावसायिक संकुल बनवण्याचा घाट रचत आहे. त्यातच या संकुलासाठी उद्यानाचीही मोठ्या प्रमाणात जागा घेतली जाणार असल्याचा गांधीबाग उद्यान बचाव संघर्ष समितीचा आरोप आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे असलेले हे उद्यानच संपवण्याचा घाट नागपूर महापालिकेकडून काही सत्ताधारी पक्षात्या नेत्यांच्या दबावात घेतल्याचा समितीचा आरोप आहे. हे उद्यान वाचवण्यासाठी आता येथे पत्रक वाटप आणि इतरही प्रकारे जनजागृती करून नागरिकांना याबाबत माहिती देणे सुरू करण्यात आले आहे.

केंद्रीय मंत्री गडकरींच्या स्वप्नाचे काय?

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी सर्वत्र खेळाचे मैदान व उद्यानांचा विकास केला जाणार असल्याचे वेळोवेळी घोषित केले आहे. त्यानुसार गांधीबाग उद्यानाचाही विकास होणे अपेक्षित आहे. परंतु, येथे व्यावसायिक संकुल तयार करून या गडकरींच्या स्वप्नाची राख केली जाणार असल्याचेही गांधीबाग उद्यान बचाव समितीचे संयोजक रमन पैगवार यांनी सांगितले.

हेही वाचा – गडकरींविरुद्ध महाविकास आघाडीचा उमेदवार कोण?

जलतरण तलावही बंद

गांधीबाग उद्यानाच्या चारही दिशेला विविध महान व्यक्तींचे स्मारक आहेत. एकीकडे साई भगत कवरराम यांची प्रतिमा तर दुसरीकडे कुंभारे यांचा पुतळा आहे. तिसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक हेडगेवार यांची प्रतिमा तर एकीकडे सोक्ता भवन आहे. येथील जलतरण तलाव आधीच बंद करण्यात आला आहे. तर आता सोक्ता भवनही अडगळीत असून तेथे कचराघर सदृश्य चित्र आहे. तातडीने सोक्ता भवनात सुधारणा करून येथे विविध नागरिकांसाठी उपयोगी उपक्रम राबवण्याची मागणीही समितीकडून केली गेली.

नियमांना तिलांजली

गांधीबाग उद्यानातील सांस्कृतिक भवनाला पाडून तेथे व्यावसायिक संकुल बनवण्याचा घाट २००३ पासून सुरू आहे. त्यासाठी येथील ६,७०० फुट सांस्कृतिक भवनाचे आरक्षण हटवून व्यावसायिक संकुल करण्यासाठी राज्य शासनाची परवानगी घेतली गेली. नागरिकांच्या विरोधामुळे हा प्रकल्प थंडबस्त्यात गेला. २०१६ मध्ये सोक्ता भवनाच्या ६,७०० फुट जागेसह गांधीबाग उद्यानाताली ६८ हजार वर्ग फूट जागेसह येथे व्यावसायिक संकुलचे कंत्राट काढण्याचा घाट पुन्हा रचला गेला आहे. परंतु, या प्रकल्पापूर्वी येथील स्थानिक नागरिक व दुकान व्यावसायिकांकडून त्यांचे मतही जाणून घेतले गेले नाही. याबाबत कोणतीही सार्वजनिक सूचना काढली नसून सगळ्या नियमांना तिलांजली दिल्याचे गांधीबाग बगीचा बचाव संघर्ष समितीचे रमन पैगवार यांनी सांगितले.