नागपूर : ढाकाहून दुबईकडे ४०० प्रवाशांना घेऊन निघालेल्या विमानातून अचानक धूर निघू लागला.वैमानिकाला आग लागल्याचा संशय आल्याने विमान नागपूरकडे वळण्यात आले. रात्री साडेदहाच्या सुमारास इमरजन्सी लँडिग करण्यात आले. नरेंद्रनगर येथील अग्निशमन विभागाच्या गाड्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचल्या. विमान उतरताच सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर विमानाची तपासणी करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

धूराचे अद्याप कारण समजले नाही. तांत्रिक कारणामुळे इमरजन्सी लँडिंग आल्याचे प्रशासन सांगत आहे. हे विमान तपासणीसाठी नागपूर विमातळावर ठेवण्यात आले असून अन्य विमान मागवण्यात आले आहे. त्यातून प्रवाशांना दुबईला पोहोचवले जाणार आहे. या प्रवाशांची रात्री दोन वेगवेगळ्या हॉटेलमध्ये व्यवस्था करण्यात आली.हे विमान अजूनही नागपूर विमानतळावर आहे. तसेच प्रवासी देखील नागपुरात अडकून पडले आहेत. त्यांच्यासाठी विमान मागवण्यात आले. आज सायंकाळी सहा वाजता या प्रवाशनांना विमान दुबईकडे रवाना होण्याची शक्यता आहे.

यापूर्वी नागपूर विमानतळावर देश-परदेशातील विमानांचे अनेकदा इमरजन्सी लँडिंग झाले आहे. प्रवाशाची प्रकृती अचानक बिघडल्याने मस्कतहून बँकॉकला जात असलेल्या ओमान एअरलाईन्सच्या विमानाचे नागपूर विमानतळावर इमरजन्सी लँडिंग करण्यात आले होते. ओमान एअरलाईन्सचे विमान २ नोव्हेंबरला मस्कतहून बँकॉकला जात होते.

यादरम्यान विमानातील एक प्रवाशाची प्रकृती बिघडली. वैद्यकीय आणीबाणीची स्थिती निर्माण झाल्याने वैमानिकाने तातडीने विमान नागपूरकडे वळवले. लगेच नागपूर विमानतळावरील हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली आणि विमान सुरक्षितपणे नागपूर विमानतळावर उतरवण्यात आले. तोपर्यंत विमानतळावर रुग्णवाहिकेसह तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक तयार ठेवण्यात आले होते.विमान उतरताच आजारी पडलेल्या प्रवाशाला तत्काळ एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले.