नागपूर: अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिराचा अभिषेक सोहळा २२ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे.  यानिमित्ताने नागपूरसह देशभरात विविध धार्मिक कार्यक्रमांची जय्यत तयारी सुरू आहे. नागपुरात  हलबा समाज शिल्पकार असोसिएशनच्या २० हून अधिक कलाकारांनी भगवान श्री रामाचे ३१ फूट उंचीचे कटआउट बनवण्याची तयारी सुरू केली आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपुरातील गोळीबार चौकात हे भव्य दिव्य कटआऊट तयार होणार आहे.  त्याचे वैशिष्ट्य म्हणजे ते चौकावरच तयार केले जाणार आहे.  त्यासाठी वॉटरप्रूफ प्लाय, वॉटर कलर आदींचा वापर करण्यात येणार आहे.  या भव्य दिव्य कटआउटचे डिझाईन तयार केले जात आहे.  त्याचे बांधकाम १५ जानेवारीपासून सुरू होणार आहे.  २० जानेवारीपर्यंत ते तयार होईल. हे कटआउट येथील एका इमारतीवर लावण्यात येईल. त्याची विधिवत पूजा २२ जानेवारीला होणार आहे. २१ व २२ जानेवारी रोजी येथे धार्मिक कार्यक्रम व प्रसाद वाटप होणार आहे.  या संदर्भात रविवारी हलबा समाज मूर्तिकार संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली.  बैठकीत शंकर धार्मिक, शंखनाथ बिनेकर, अविनाश हेडाळ, भूषण झाडे, योगेश खापेकर, मोनू बुरडे, हर्षल घोराडकर, हरिहर खापेकर, शांताराम पराते, दीपक पाटेकर, प्रवीण धकाते, सीताराम रामटेककर, भाऊराव पराते आदी उपस्थित होते. या उपक्रमात मदत करण्यात उत्सुक असलेल्यांनी अधिक माहितीसाठी संघाचे ज्ञानेश्वर बारापात्रे, राकेश पाठराबे, सचिन पराते, नीलेश बिनेकर, राजू पखाले, चंद्रकांत चवरे आदींशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Planning during temple celebrations in ayodhya by halba samaj shilpkar sangh nagpur mnb 82 amy
Show comments