लोकसत्ता टीम
अमरावती: पंढरपुरात आषाढी एकादशीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो भाविक दाखल होतात. प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने पंढरपूरसाठी ७६ विशेष गाड्यांचे नियोजन केले आहे. यातील १६ फेऱ्यांतून विदर्भातील भाविकांचीही सोयी होणार आहे. यात नागपूर-मिरज (४ फेऱ्या), नागपूर-पंढरपूर (४ फेऱ्या), नवी अमरावती-पंढरपूर (४ फेऱ्या), व खामगाव-पंढरपूर (४ फेऱ्या) या विशेष गाड्या विदर्भातून धावणार आहेत.
नागपूर-मिरज विशेष गाडी क्रमांक ०१२०५ विशेष गाडी २५ आणि २८ जून रोजी ८.५० वाजता नागपूरहून सुटून दुसऱ्या दिवशी ११.५५ वाजता मिरजला पोहोचेल. तर गाडी क्रमांक ०१२०६ ही गाडी २६ आणि २९ जून रोजी १२.५५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी १२.२५ वाजता नागपूरला पोहोचेल. या गाडीला अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुर्डूवाडी, पंढरपूर, सांगोला, म्हसाबा डोंगरगाव, जठरगाव धालगाव, कवठेमहांकाळ व सुलगरे या ठिकाणी थांबा दिला आहे.
नागपूर-पंढरपूर विशेष गाडी क्रमांक ०१२०७ विशेष नागपूरहून २६ आणि २९ जूनला ८.५० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी ८ वाजता पंढरपूरला पोहोचेल. गाडी क्रमांक ०१२०८ विशेष पंढरपूर येथून २७ आणि ३० जून रोजी दुपारी ५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी १२.२५ वाजता नागपूरला पोहोचेल. या गाडीला अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर, दौंड, कुर्डूवाडी या ठिकाणी थांबा दिला आहे.
अमरावती-पंढरपूर गाडी क्रमांक ०१११९ ही विशेष गाडी अमरावती येथून २५ व २८ जून रोजी दुपारी २.४० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी ९.१० वाजता पंढरपूरला पोहोचेल. गाडी क्रमांक ०११२० पंढरपूर येथून २६ व २९ जून रोजी सायंकाळी ७.३० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी १२.४० वाजता अमरावती येथे पोहोचेल. या गाडीला बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, जलंब, नांदुरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर, दौंड हे थांबे आहे.