लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमरावती: पंढरपुरात आषाढी एकादशीनिमित्त‎ संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो भाविक‎ दाखल होतात. प्रवाशांची गर्दी‎ लक्षात घेऊन मध्य रेल्वेने पंढरपूरसाठी ७६ विशेष‎ गाड्यांचे नियोजन केले आहे.‎ यातील १६ फेऱ्यांतून विदर्भातील‎ भाविकांचीही सोयी होणार आहे.‎ यात‎ नागपूर-मिरज (४ फेऱ्या),‎ नागपूर-पंढरपूर (४ फेऱ्या), नवी‎ अमरावती-पंढरपूर (४ फेऱ्या), व‎ खामगाव-पंढरपूर (४ फेऱ्या) या विशेष गाड्या ‎ विदर्भातून धावणार आहेत.‎

नागपूर-मिरज विशेष गाडी‎ क्रमांक ०१२०५ विशेष गाडी २५‎ आणि २८ जून रोजी ८.५० वाजता ‎ ‎ नागपूरहून सुटून दुसऱ्या दिवशी‎ ११.५५ वाजता मिरजला पोहोचेल.‎ तर गाडी क्रमांक ०१२०६ ही गाडी २६‎ आणि २९ जून रोजी १२.५५ वाजता‎ सुटून दुसऱ्या दिवशी १२.२५ वाजता‎ नागपूरला पोहोचेल. या गाडीला‎ अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव,‎ चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर,‎ अकोला, शेगाव, मलकापूर,‎ भुसावळ, जळगाव, चाळीसगाव,‎ मनमाड, कोपरगाव, बेलापूर,‎ ‎अहमदनगर, दौंड, कुर्डूवाडी,‎ पंढरपूर, सांगोला, म्हसाबा‎ डोंगरगाव, जठरगाव धालगाव,‎ कवठेमहांकाळ व सुलगरे या‎ ठिकाणी थांबा दिला आहे.‎

आणखी वाचा-आमच्या आत्मदहनाची वाट बघता का? पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेचे निकाल प्रलंबित असल्याने विद्यार्थी त्रस्त

नागपूर-पंढरपूर विशेष गाडी क्रमांक‎ ०१२०७ विशेष नागपूरहून २६ आणि‎ २९ जूनला ८.५० वाजता सुटून‎ दुसऱ्या दिवशी ८ वाजता पंढरपूरला‎ पोहोचेल. गाडी क्रमांक ०१२०८ विशेष पंढरपूर येथून २७ आणि ३०‎ जून रोजी दुपारी ५ वाजता सुटून‎ दुसऱ्या दिवशी १२.२५ वाजता‎ नागपूरला पोहोचेल. या गाडीला‎ अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव,‎ चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर,‎ अकोला, शेगाव, मलकापूर,‎ भुसावळ, जळगाव, चाळीसगाव,‎ मनमाड, कोपरगाव, अहमदनगर,‎ दौंड, कुर्डूवाडी या ठिकाणी थांबा‎ दिला आहे.

अमरावती-पंढरपूर‎ गाडी क्रमांक ०१११९ ही विशेष गाडी‎ अमरावती येथून २५ व २८ जून रोजी‎ दुपारी २.४० वाजता सुटून दुसऱ्या‎ दिवशी ९.१० वाजता पंढरपूरला‎ पोहोचेल. गाडी क्रमांक ०११२०‎ पंढरपूर येथून २६ व २९ जून रोजी‎ सायंकाळी ७.३० वाजता सुटून‎ दुसऱ्या दिवशी १२.४० वाजता‎ अमरावती येथे पोहोचेल. या‎ गाडीला बडनेरा, मूर्तिजापूर,‎ अकोला, शेगाव, जलंब, नांदुरा,‎ मलकापूर, बोदवड, भुसावळ,‎ जळगाव, पाचोरा, चाळीसगाव,‎ नांदगाव, मनमाड, कोपरगाव,‎ अहमदनगर, दौंड हे थांबे आहे.