चंद्रपूर- संगणक अभियंता असलेल्या एका युवकाने आपल्या शेतात सुगंधी जिरेनियम वनस्पतीची लागवड केली.मागीलवर्षी लावण्यात आलेले या वनस्पतीची रोपे आता मोठी झाली आहे. त्यातून एकरी ते चार लाखांचे उत्पन्न होत आहे. या नाविन्यपूर्ण प्रयोगाची दखल कृषी विभागानेही घेतली आहे.आपल्या भागातील शेतकऱ्यांनी असे प्रयोग आपल्या शेतात करावे, असे आवाहनही कृषी विभागाने शेतकऱ्यांना केले आहे. सुगंधी जिरेनियम वनस्पतीचा प्रयोग आपल्या शेतात करणाऱ्या संगणक अभियंत्याचे नाव केतन माणूसमारे आहे. केतन माणूसमारे हा मूळचा वरोऱ्याचा. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी पुणे गाठले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तिथे केतनने अभियांत्रिकी अभ्यासक्रमात प्रवेश घेतला. पाच वर्ष शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिथेच तो एका कंपनीत संगणक अभियंता म्हणून रूजू झाला. नोकरीवर लागल्यानंतर कोरोनाची लाट आली. यामुळे सर्वच ठप्प पडले. त्यामुळे केतनही आपल्या मूळ गावी परतला. त्या दिवसांत घरूनच काम सुरू होते. अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असतानाच केतनच्या मनात शेती करायची इच्छा होती.

हेही वाचा >>>यवतमाळ: भर पावसात अर्धनग्न आंदोलन; मारेगावात घरात पाणी शिरल्याने नागरिक त्रस्त

मात्र, वेळ मिळत नसल्याने त्याने त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. मात्र, कोरोनाच्या काळात त्याने शेती करण्याचा निर्णय घेतला. आपल्याकडील शेतात काही नाविन्यपूर्ण प्रयोग करता येऊ शकते हा याचा त्याने अभ्यास सुरू केला. पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर सुगंधी जिरेनियम वनस्पतीची लागवड केली जाते. त्यातून मोठे उत्पन्न शेतकरी घेत असल्याचे केतनच्या लक्षात आले. त्यामुळे त्याने हा प्रयोग आपल्या शेतात करण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा >>>नागपूर: तासिका प्राध्यापकांकडून दोन महाविद्यालयात अध्यापन! प्रतिज्ञापत्र दिल्यानंतरही शासनाची फसवणूक

मुंबई येथील एका कंपनीतून केतनने सुगंधी जिरेनियमची दीड लाख रोपे मागीलवर्षी मागवली. चिमूर-शेगाव मार्गावर खातोडा येथे केतन माणूसमारे यांची पंधरा एकर शेती आहे. याच शेतात त्याने टप्प्याटप्प्याने सुगंधी जिरेनियम वनस्पतीची रोपे लावली. हे रोप एकदा लावले की एका वर्षात तीनदा कापणी करता येते. या रोपावर खत व कीटकनाशकाचा खर्चही कमी होतो. रोपे आता मोठी झाली. त्यापासून तेल काढण्यासाठी केतनने शेतातच युनिट तयार केले आहे. एकरी चाळीस टन उत्पादन वर्षाला होते. त्यापासून ३० ते ४० किलो सुगंधी तेल तयार होते, असे केतनने सांगितले.

हेही वाचा >>>गोंदिया: नागझिरात सोडलेली टी-१ वाघीण मध्यप्रदेशातील किरणापूर जंगलात स्थिरावली !

दहा ते बारा हजार रुपये किलो भाव

जिरेनियम वनस्पतीपासून निघालेल्या सुगंधी तेलाला बाजारात मोठी मागणी आहे. या तेलापासून सौंदर्य प्रसाधने, अत्तर तयार केले जाते. थेरपीतही या तेलाचा वापर केला जातो. बाजारात दहा ते बारा हजार रुपये किलोने हे तेल विकले जाते. सध्या मुंबईच्या एका कंपनीत हे तेल पाठविले जात असल्याची माहिती केतन माणूसमारे याने दिली. आपल्या भागातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात जिरेनियम वनस्पती लावावी यासाठी केतन जनजागृती करीत आहे. आता रोपे तयार करून ते या भागातील शेतकऱ्यांना दिले जाणार असल्याचेही त्याने सांगितले.