दोन आरोपींनी लाखोंचा भूखंड एका महिलेचे बनावट बहीण-भाऊ दुय्यम निबंधक कार्यालयात उभे करून हडपला. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल करून एकास अटक केली. मोहम्मद इमरान मो. बद्रूद्दीन (फ्रेंड्स कॉलनी) आणि दिनेश शंकरराव जाधव (४३, जाततरोडी) अशी आरोपींची नावे आहेत.

हेही वाचा – बुलढाणा: मलकापूरनजीक टिप्पर-आयशरची धडक; ३ ठार, १ गंभीर

News About Vande Bharat Train
Vande Bharat : कोल्हापूर ते पुणे वंदे भारत ट्रेन सुरु, देवेंद्र फडणवीस म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी…”
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Piyush Chawla Predict Shubman Rururaj Team Indias next Virat Rohit
कोण आहेत टीम इंडियाचे भावी विराट-रोहित? पियुष चावलाने सांगितली ‘या’ दोन खेळाडूंची नावं
Shinde faction leader Shambhuraj Desai and Thackeray faction leader Ambadas Danve took darshan of Shrimant Dagdusheth Halwai Ganapati
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई आणि ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी घेतले दर्शन
Sitaram Yechury, Nagpur University,
नागपूर विद्यापीठाने ऐनवेळी रद्द केले होते सीताराम येच्युरी यांचे व्याख्यान
R Ashwin roasted Pakistan cricket fan for trolling Nitish Reddy
R Ashwin : नितीश कुमार रेड्डीची खिल्ली उडवणाऱ्या पाकिस्तानी चाहत्याला अश्विनने शिकवला चांगलाच धडा, मीम्स व्हायरल
PM modi daruslam visit
ब्रुनेई दारुसलामला पंतप्रधान मोदींची ऐतिहासिक भेट; ब्रुनेई आणि भारताचे संबंध कसे आहेत?
Yograj Singh Statement on Kapil Dev
Yograj Singh on Kapil Dev: “मी कपिल देवला सांगितलेलं, तुझी अशी अवस्था करेन…”, युवराजचे वडिल योगराज सिंगांचं धक्कादायक वक्तव्य

हेही वाचा – लग्नानंतर पंधराव्या दिवशीच ‘ती’ इमारतीवरून पडली, शरीरावर मारहाणीच्या खुणा, काय घडले?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमिला किशोर गायकवाड (५०, शनिवारी, कॉटनमार्केट) यांचा गोरेवाडा येथे वडिलोपार्जित भूखंड आहे. त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर त्या भूखंडाकडे कुणाचेही लक्ष नव्हते. त्यामुळे, आरोपी मो. इमरान याने दिनेश जाधव याला हाताशी धरले. प्रमिला यांचे भाऊ आणि बहीण यांच्या जागेवर बनावट पुरुष व महिला दुय्यम निबंधक कार्यालयात उभे केले. भूखंडाचे मूळ मालक असल्याचे दाखवून त्यांची बनावट आधारकार्ड व अन्य कागदपत्रे तयार केली. त्यावरून तो भूखंड परस्पर आपल्या नावे केला. पोलिसांनी दोघांवरही गुन्हा दाखल केला.