वर्धा : बेपत्ता झालेली महिला तब्बल दोन महिन्यांनी आपल्या घरी सुखरूप पोहोचली आहे. एखाद्या फिल्मी कथेप्रमाणे घडलेली ही घटना फेसबुकमुळे घडली व फेसबुकनेच उजेडात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तालुक्यातील येळाकेळी येथील एका विवाहितेस एका अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले होते. तशी तक्रार तिच्या पतीने १५ ऑगस्ट रोजी सेलू पोलिसांकडे केली. अथक तपास करूनही शोध लागत नव्हता. सदर महिलेने घरून जाण्यापूर्वी फेसबुक मेसेंजरवर एक संदेश टाकला होता. त्यावरून तपासाची दिशा ठरविण्यात आली. ठावठिकाणा समजला.

हेही वाचा – आघाडी सरकारद्वारे सुरुवात, विद्यमान सरकारकडून विस्तार

हेही वाचा – नमो ११ ! ‘या’ पालिकांचे होणार सौंदर्यीकरण व आरोग्यसंवर्धन

पोलीस निरीक्षक धनंजय पांडे तसेच अखिलेश गव्हाणे, सचिन वाटखेडे, रुखसाना शेख यांचे पथक बिहारला रवाना झाले. महिला ही वैशाली जिल्ह्यातील पिरापूर मथुरा या गावात असल्याचे तांत्रिक बाबीने दिसून आले. हे गाव अतिदुर्गम भागात तसेच संवेदनशील असल्याने मोठे आव्हान होते. मात्र पोलिसांनी विविध संकटे दूर करीत महिलेस ताब्यात घेतले. तिला आता तिच्या कुटुंबाच्या हवाली करण्यात आले आहे. हे गाव नेपाळ सीमेपासून जवळच आहे. या महिलेस नेपाळमध्ये विकण्याचा डाव होता, अशी माहिती पुढे आली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Plot to sell missing married woman taken into custody from bihar pmd 64 ssb