Nagpur and Bilaspur Vande Bharat Express: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज नागपूरमध्ये नागपूर- बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. मध्य भारतातील ही पहिली वंदे भारत एक्सप्रेस आहे. महाराष्ट्रातील दुसरी अशा प्रकारची एक्स्प्रेस आहे. सकाळी साडेनऊ वाजता पंतप्रधानांचे नागपूर विमानतळावर आगमन झाले. तेथून ते थेट रल्वे स्थानकावर गेले. तेथे नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेसला त्यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला. ही रेल्वे नेमकी कशी आहे जाणून घेऊयात…

> ही देशातील सहावी तर महाराष्ट्रातील दुसरी वंदेभारत एक्सप्रेस ठरणार आहे.

> ३० सप्टेंबर २०२२ रोजी मुंबई सेंट्रल -अहमदाबाद ही देशातील तिसरी व महाराष्ट्रातील पहिली वंदेभारत एक्सप्रेस धावली.

> स्वदेशी बनावटीची वंदे भारत एक्सप्रेस ही भारतीय अभियंत्यांच्या क्षमतेची साक्ष आणि मेक इन इंडिया उपक्रमाचा कळस आहे.

> या एक्सप्रेस गाडीच्या माध्यमातून महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर आणि छत्तीसगडची राजधानी रायपूर आणि बिलासपूर ही महत्वाची शहर जोडली जाणार.

> नागपूर – बिलासपूर एकूण अंतर: ४१२ कि.मी.

> प्रवास वेळ : ५.३० तास

> उभय शहरांदरम्यान आठवड्यातून ६ वेळा धावणार वांदे भरत एक्सप्रेस. शनिवारी सेवा बंद असणार.

> गाडीला एकूण १६ कोच असून प्रत्येक कोचमध्ये प्रवाशांच्या माहितीसाठी ३२ इंचीच्या डिजिटल स्क्रिन.

> प्रवासी घेणार वेगवान व सुरक्षित प्रवासाचा अनुभव. विमान प्रवासाची प्रचिती घेतानाच ‘कवच’ या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून या एक्सप्रेस गाडीत सर्वोत्तम सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे.

> प्रत्येक कोचमध्ये प्रवाशांची माहिती आणि इंफोटेनमेंट उपलब्ध. दिव्यांग प्रवाश्यांची काळजी घेण्यात आली आहे.

> ठीक -ठिकाणी ब्रेल लिपीतून माहिती व सूचना देण्यात आल्या आहेत.

> टच फ्री सुविधांसह व्हॅक्यूम प्रसाधनगृह, उच्च कार्यक्षमतेच्या कंप्रेसरद्वारे उत्कृष्ट वेंटिलेशन आणि वातानुकूलन नियंत्रण.