पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांचा नागपूर दौरा संपला, पण त्याचे कवित्व सुरूच आहे. त्यांच्या भरगच्च कार्यक्रमा दरम्यान घडलेल्या घटना, घडामोडींवर चर्चा सुरू आहे. यापैकीच एक चर्चा आहे ती  मोदींचा मेट्रो प्रवास आणि या दरम्यान त्यांनी कुशीत घेतलेल्या बाळाची. कोणाचे होते हे बाळ आणि ते मोदींपर्यंत पोहचले कसे? याची कथा रंजक आहे.

हेही वाचा >>> नागपूर: जिल्ह्यातील १० टक्के मार्गांवर ८५ टक्के अपघात

maharashtra winter updates
स्वेटर, शॉल शोधलीत का…? कारण, उद्यापासून हुडहुडी…
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Rahul Gandhi poha Nagpur
राहुल गांधी नागपुरात आले आणि…टमाटरने सजवलेल्या तर्री पोह्यांसाठी थेट….
Vidarbha Marathwada passengers facing problem due to no train between Nagpur to Sambhajinagar
नागपूर संभाजीनगरला जोडणारी एकही रेल्वेगाडी का नाही
success story of Sindhu brothers who grows keshar with aeroponics method most expensive spice sells it for lakhs
भावांनी घरातच केली केशरची शेती, प्रगत तंत्रज्ञान वापरून मातीशिवाय हवेत वाढतात झाडे, वाचा त्यांचा प्रेरणादायी प्रवास
lokjagar article about issues in maharashtra assembly election
लोकजागर : भीती आणि आमिष!
emboldened rioters attacked police officer in nashik
पतीचा पत्नी, मेहुणी, सासऱ्यावर कुऱ्हाडीने हल्ला

पंतप्रधान नरेंद्र मोदी मेट्रोने प्रवास करणार हे निश्चित झाल्यावर त्यांच्या सोबत कोणकोण असणार यावर चर्चा झाली.पंतप्रधान कार्यालयाकडून आलेल्या सूचनेनुसार १० मिनिटाच्या प्रवासा दरम्यान शाळा, महाविद्यालयातील मुले, मुली, सर्वोत्तम स्टार्ट अपचे मालक, मेट्रोचे अधिकारी, कर्मचारी यांची यासाठी निवड करण्यात आली. स्टार्ट अपचे प्रतिनिधी म्हणून रितिका व सुमीत ताजपुरिया या दाम्पत्याची निवड झाली .त्यांना फक्त दोन मिनिटे मोदी भेटीसाठी देण्यात आले होते. . तीन डब्ब्याच्या मेट्रोमध्ये मोदी मधल्या डब्ब्यात बसले होते. त्यांना भेटणारे त्या लगतच्या डब्ब्यात बसले होते. रितिका व सुमीत हे त्यांचे दहा दिवसाचे बाळ घेऊन आले होते. 

हेही वाचा >>> नागपूर: शिस्तप्रिय पोलीस खात्यात खळबळ, सुटी नाकारल्यामुळे पोलीस हवालदाराने थेट…

मोदींच्या भेटीच्या वेळी त्यांनी बाळाला सोबत घेतले नव्हते. त्याला बाजूच्या डब्ब्यात ठेवले होते. मोदींशी दोन मिनिट स्टार्ट अप वर चर्चा झाली. वेळ संपल्याने रितिका यांनी मोदींना त्याचे दहा दिवसांचे बाळ बाजूच्याच डब्ब्यात असून त्याला आपण आशीर्वाद द्यावे, अशी विनंती केली. मोदींनी ती मान्य केली व बाळाला आणण्यास सांगितले. रितिका यांनी बाळाला आणतात मोदींनी त्याला जवळ घेतले व आशीर्वाद दिले. यामुळे ताजपुरिया दाम्पत्य भारावून गेले.