पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नागपूर दौऱा अनेक दृष्टीने महत्वाचा ठरणारा झाला आहे. पंतप्रधानांच्या हस्ते रविवारी दोन नव्या मार्गिकांच्या उद्गघाटन. झाले. त्यावेळी त्यांनी मेट्रोतून प्रवासही केला. पण हा प्रवास त्यांनी स्वत: तिकीट खरेदी करून एक नवा पायंडा पाडला.
पंतप्रधानांच्या हस्ते रविवारी मेट्रोच्या कस्तूरचंद पार्क ते ऑटोमोटिव्ह चौक आणि बर्डी ते प्रजापती नगर या दोन नव्या मार्गिकेचे उद्गघाटन केले.
रेल्वेस्थानकावरील कार्यक्रम आटोपून मोदी थेट मेट्रोच्या झिरोमाईल स्थानकावर आले. तेथून त्यांनी खापरी मेट्रोस्थानकापर्यंत मेट्रोतून प्रवास केला. या दरम्यान त्यांनी रितसर तिकीट खरेदी केले होते.
हेही वाचा: नागपूर: ढोलताशाच्या निनादात समृद्धीचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण
खापरी स्थानकावर मेट्रो टप्पा-१् चे लोकार्पण, मेट्रो -२् चे भूमिपूजन केले. पंतप्रधानांनी मेट्रो प्रवासात विद्यार्थिनींशी संवाद साधला, कर्मचाऱ्यांशीही चर्चा केली. यावेळी त्यांच्या समवेत महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांच्यासह इतरही प्रमुख मेट्रोचे अधिकारी उपस्थत होते.