नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबरला बहुचर्चित नागपूर- मुंबई हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गाचे उद्घाटन होणार आहे. पण फक्त समृध्दी महामार्गाचेच नव्हे चार इतर प्रकल्पाचे उद्घाटन सुध्दा मोदी करणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंतप्रधानांच्या उपस्थित होणा-या कार्यक्रमासाठी मिहान परिसरात भव्य मंडप उभारण्याचे काम सध्या सुरू आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह केंद्र व राज्यातील अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत. पण या कार्यक्रमात फक्त समृध्दी महामार्गच नव्हे तर तितक्याच तोलामोलाच्या इतर प्रकल्पाचे उद्घाटन मोदींच्या हस्ते होणार आहेत.

हेही वाचा: पंतप्रधानाच्या कार्यक्रमाचे स्थळ बदलले; समृध्दीसह अनेक अन्य प्रकल्पांचे उद्घाटन करणार

त्यात प्रामुख्याने एम्सचे लोकार्पण, मेट्रोच्या दोन नवीन मार्गिकेचे उद्घाटन, नागपू-बिलासपूर वंदेभारत एक्सप्रेसचा प्ररंभ आणि नागपूर और अजनी रेल्वे स्थानक पुनर्विकास योजनेचे भूमिपूजन आदींचा समावेश आहे. पंतप्रधानांच्या दौ-यामुळे प्रशासन सतर्क झाले असून ज्या मार्गावरून जाणार आहेत ते रस्ते दुरुस्त केले जात आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi is going to inaugurate many projects including samriddhi highway in nagpur cwb76 tmb 01