चंदशेखर बोबडे, लोकसत्ता
नागपूर मेट्रोच्या दोन मार्गिकेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबरला होत आहे. पण या पूर्वी दोन वेळा म्हणजे २०१९ व २०२० या वर्षीत त्यांचा हस्ते दोन वेगवेगळ्या मेट्रो मार्गिकेच्या उद्घाटनाचा मुहूर्त टळला होता.
नागपूर मेट्रोचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते २०१४ मध्ये झाले होते .डिसेंबर २०२२ मध्ये हा प्रकल्प पूर्ण झाला. त्याच्या दोन मार्गिकांचे उद्घाटन उद्घाटन रविवारी पंतप्रधान करणार आहेत. मात्र यापूर्वी २०१९ मध्ये बर्डी- ते खापरी या १३ किमीच्या पहिल्या मार्गिकेचे उद्घाटन २० मार्च २०१९ मध्ये पंतप्रधानांच्या हस्ते होणार होते. सर्व तयारी पूर्ण झाली होती. ऐनवेळी तांत्रिक कारणांमुळे हा दौरा रद्द झाला होता व पंतप्रधानांनी ऑनलाईन उद्घाटन केले होते.
हेही वाचा >>> नागपूर रेल्वे स्थानकात मुख्य प्रवेशद्वार बंद, तिकीट खिडकी हलवली ! पंतप्रधानाच्या दौऱ्यामुळे प्रवासी वेठीस
त्यानंतर मेट्रोची बर्डी- लोकमान्य नगर या मार्गिकेचे काम पूर्ण झाले. ऑगस्ट २०१९ मध्ये पंतप्रधानांच्या हस्ते या मार्गिकेचे उद्घाटन होणार होते. पण ऐनवेळी पाऊस आल्याने पंतप्रधानांचा दौरा रद्द झाला. त्यानंतर राज्यात सत्तांतर झाले. २८ जानेवारी २०२० मध्ये झाले. या दरम्यान महामेट्रोने पंतप्रधानांना मेट्रोच्या कार्यक्रमासाठी बोलण्याचे प्रयत्न केले. मात्र त्यांची वेळ मिळू शकली नाही. मधल्या काळात पंतप्रधानांनी पुणे मेट्रोला भेट दिली होती. पण नागपूर मेट्रो भेटीचा योग येत नव्हता. अखेर तो योग ११ डिसेंबरला जुळन येणार आहे.