पंतप्रधान नरेंद्र मोदी ११ डिसेंबरला नागपूरमध्ये  येणार असूंन त्यांच्या एक तासाच्या दौ-यात त्यांच्या हस्ते जुन्या प्रकल्पाचे लोकार्पण, पूर्ण झालेल्या प्रकल्पाचे उदघाटन आणि नव्या प्रकल्पांची पायाभरणी केली जाणार आहे. एकूण ७५ हजार कोटींचे हे प्रकल्प आहेत.

हेही वाचा >>> नागपूर: पंतप्रधानांच्याहस्ते मेट्रो उद्घाटनाचा मुहूर्त यापूर्वी दोन वेळा का टळला ? काय होती कारणे?

पंतप्रधान सकाळी ९;३० वाजता  नागपूर रेल्वे स्थानकावर पोहोचतील, तिथे ते वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. सकाळी सुमारे १० वाजता, पंतप्रधान फ्रीडम पार्क मेट्रो स्थानकापासून खापरी मेट्रो स्थानकापर्यंत  मेट्रोमधून प्रवास करतील ,तिथे  ते ‘नागपूर मेट्रो टप्पा एक  राष्ट्राला समर्पित करणार आहेत .या कार्यक्रमादरम्यान ते ‘नागपूर मेट्रो टप्पा -दोन’ ची पायाभरणीही करतील. सकाळी १०;४५ वाजता पंतप्रधान  समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण   आणि  महामार्गाचा दौरा करतील. सकाळी ११.४५ वाजता पंतप्रधानांच्या हस्ते  एम्स नागपूरचे राष्ट्रार्पण होणार आहे. त्याच बरोबर १५०० कोटींचा राष्ट्रीय रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी,  राष्ट्रीय  वन हेल्थ संस्था (एनआयओ ), नागपूर आणि  नागपुरातील नाग नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पाची  पायाभरणीही करतील.या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान ,केंद्रीय पेट्रोकेमिकल्स अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान  (सीआयपीईटी) संस्था , चंद्रपूर’ राष्ट्रार्पण आणि ‘हिमोग्लोबिनोपॅथी संशोधन, व्यवस्थापन आणि नियंत्रण केंद्र , चंद्रपूर’ चे  लोकार्पण करणार आहेत.