लोकसत्ता टीम

वाशीम : सध्या सर्वत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संविधान बदलणार म्हणून काँग्रेस व विरोधी पक्ष अपप्रचार करीत आहे. ही निव्वळ अफवा आहे. कारण संविधान बदलणे कुणालाही शक्य नाही. संविधान अत्यंत मजबूत आहे. त्यामुळे जनतेने काँग्रेसच्या अफवेला बळी पडू नये, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

Ajit Pawar And Amol Mitkari.
Ajit Pawar : “…तर सरकारलाही अर्थ नाही”, अजित पवार आणि अर्थ खात्यावरून अमोल मिटकरींचा महायुतीलाच टोला
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
State Congress president Nana Patole demanded those who desecrate constitution should punished
“संविधानाची विटंबना करण्याचे धाडस होतेच कसे,” नाना पटोले यांची टीका; म्हणाले…
Sadhguru disheartened over Parliament disruptions on adani issue
Sadhguru on Adani: ‘उद्योगपतींवरून संसदेत रणकंदन नको’, अदाणींना समर्थन देत सद्गुरुंनी व्यक्त केली नाराजी
ajit pawar meets sharad pawar
पहिला मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार? अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले…
Rahul narvekar
विरोधी पक्षनेतेपदासाठी अद्याप अर्जच नाही, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे स्पष्टीकरण
Jyotiraditya Scindia lady killer said Kalyan Banerjee
“सिंधिया लेडी किलर”, तृणमूलचे खासदार असं का म्हणाले? केंद्रीय मंत्र्याचंही जशास तसं प्रत्युत्तर
News About Loksabha
Parliament : संसदेत उफाळून आलेला विधेयकांच्या नावांचा वाद काय? विरोधी पक्षांनी नेमकं काय म्हटलं आहे?

आज वाशीम येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने भूमी हक्क परिषद आयोजित करण्यात आली असता मध्यमाशी बोलत होते. यावेळी रिपाई चे जिल्हाध्यक्ष तेजराव वानखडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. पुढे बोलताना ना. रामदास आठवले म्हणाले की, राज्यात मराठा आरक्षण मागणी जोर धरित आहे. आमची मागणी आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळावे, परंतु ओबीसी व मराठा समाजात सलोखा राहावा, यासाठी प्रयत्न करणार आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वातंत्र्य आरक्षण दिले पाहिजे. असेही ते म्हणाले.

आणखी वाचा-अमरावती : अनैतिक संबंधातून युवकाची हत्‍या; ‘सीसीटीव्‍ही’मुळे हत्‍येचा उलगडा

अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांचा फार्मुला महाविकास आघाडीने स्वीकारावा..

अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी महा विकास आघाडीकडे दिलेला १२/१२ चा फार्मुला मान्य करावा. म्हणजे त्यांचे १२ वाजवायला वेळ लागणार नाही. आगामी लोकसभेत अकोल्यात बाळासाहेबांनी आम्हाला मदत करावी व त्याबदल्यात आम्ही त्यांना मदत करू असेही मिश्किल शब्दात त्यांनी भाष्य केले.

लोकसभेच्या २ जागेची मागणी

आगामी लोकसभा महायुती ताकतीने लढणार आहे. मात्र त्यांना रिपाई ची साथ गरजेची आहे. राज्यातील शिर्डी व विदर्भातील एक अश्या दोन जागा मागणार आहोत. त्यामुळे त्यांनी आमच्या कार्यकर्त्याचा सन्मान करावा. कार्यकर्ते नाराज होणार नाहीत याची खबरदारी भाजप व महायुतीने घ्यावी.

Story img Loader