नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेसला मध्यवर्ती नागपूर रेल्वेस्थानकावर हिरवा झेंडा दाखवणार आहेत. त्यामुळे मुख्य प्रवेशद्वारावरील तिकीट खिडकी बंद राहणार असून प्रवाशांनाही या भागात येण्यास मज्जाव करण्यात येणार आहे. मोदी हे देशातील सहाव्या वंदे भारत एक्सप्रेसचे लोकार्पण रविवारी सकाळी १० च्या सुमारास करतील. त्यासाठी रेल्वेस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराकडील सर्व प्रकारची तिकीट विक्री केंद्र बंद राहतील. मात्र संत्रा मार्केट प्रवेशद्वारकडे तिकीट विक्री सुरू राहणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> नागपूर: मोतीबिंदू शस्रक्रिया, काय म्हणाले फडणवीस

मुख्य प्रवेशद्वाराच्या परिसरातील आरक्षित तिकीट, अनारक्षित तिकीट, चालू आरक्षण तिकीट आणि चौकशी खिडकी शनिवारी रात्री १२ वाजून पाच मिनिटांपासून ते रविवारी दुपारी २ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. तसेच या कालावधीत ज्यांना गाडी पकडायची असेल त्या प्रवाशांना केवळ संत्रा मार्केट प्रवेशद्वारातून स्थानकावर येता येणार आहे. प्रवाशांना फलाट क्रमांक २ वर सकाळी ६ ते दुपारी २ वाजेपर्यंत जाता येणार नाही.