म्हणतात ना नावात काय असतं? पण अनेकदा नावातच सर्व काही असतं. म्हणूनच म्हणतात ‘ सिर्फ नाम ही काफी है’. पण अनेकदा नावात काहीच नसते आणि तरीही ते चर्चेचा विषय ठरते. राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासून तर देशाच्या पंतप्रधानांपर्यत या नावाची चर्चा होते. असेच एक नाव संध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर दौ-यामुळे प्राकाशझोतात आले आहे. ते नाव कोण्या व्यक्तीचे नाही तर ते आहे एका गावाचे आहे. त्याच नाव आहे ‘वायफळ’.
नावातच वायफळ’ शब्द असला तरी सध्या या गावाच्या नावाची चर्चा खूप आहे. रोज वर्तमान पत्रात ते झळकू लागले आहे. वरिष्ठ अधिकाऱी तेथे भेट देऊ लागले आहेत. असे काय आहे येथे? कारण हे गाव नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गा लगत आहे. ११ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महामार्गाचे उद्घघाटन येथे होणार आहे. त्यामुळे ते सध्या व्हीव्हीआयपींचे केंद्र बनले आहे.गाव व त्याचे नाव सध्या गल्ली पासून दिल्ली पर्यंत पोहोचले
हेही वाचा: पंतप्रधानांच्या नागपूर दौऱ्यावर पावसाचे सावट
या गावालगतच नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गावरचा पहिला टोल नाका आहे. . वायफळ’ टोलनाका असे त्याचे नामकरण करण्यात आले आहे. तेथे पंतप्रधानांच्या हस्ते फीत कापून महामार्गाचे उद्घघाटन होईल. पंतप्रधान फित कापण्यासाठी येणार म्हंटल्यावर सर्व व्हीव्हीआयपी तेथे जाणार. त्यामुळे आजवर फारसे कोणाला माहित नसलेले ‘ वायफळ’ गाव एकदम चर्चेत आले आहे.