नागपूर : शहरात भरधाव वाहन चालवणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून धूम स्टाईल’ वाहने पळवणाऱ्यांची हिंमत वाढत आहे. गेल्या दहा महिन्यांत वाहतूक पोलिसांनी १६ हजार ४५१ वाहनांवर कारवाई केली. १७ लाखांपेक्षा जास्त रुपयांचा दंड वसूल केला आहे.

वाहतूक पोलीस नसलेल्या सिग्नलवर अनेक वाहनचालक लाल दिवा लागलेला असतानाही वाहने सुसाट पळवत असतात. वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांचे धाडस दिवसेंदिवस वाढत आहे. शहरात वाहनांची संख्या वाढल्याने रस्त्यावरही वाहनांची गर्दी होत आहे. भरधाव वाहन चालवणाऱ्यांमध्ये महाविद्यालयीन तरुण-तरुणींचे प्रमाण जास्त आहे. जानेवारी ते १४ ऑक्टोबर या कालावधीत वाहतूक पोलिसांनी भरधाव वाहन चालवणाऱ्या १६ हजार ४५१ चालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली. गेल्यावर्षी वाहतूक पोलिसांनी १३ हजार ३३ वाहनचालकांविरुद्ध वेगमर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई केली होती. या कारवाईनंतर वाहनचालकांत वचक निर्माण व्हायला हवा होता. मात्र, सुसाट वाहन चालवणाऱ्यांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतच आहे.

Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Controversial statement of MP Dhananjay Mahadik on Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजनेवरून खासदार धनंजय महाडिक यांचे वादग्रस्त विधान; खासदार प्रणिती शिंदे, आमदार सतेज पाटील यांचे टीकास्त्र
drones paragliding banned in pune on occasion of pm narendra modi visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त ड्रोन, पॅराग्लायडर उड्डाणास बंदी; आदेशाचा भंग केल्यास कारवाईचा इशारा
PMPML bus caught fire in swargate depot
स्वारगेट आगारात पीएमपी बसला आग; कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे आग आटोक्यात
Marathi Rangbhoomi Divas , Marathi Theatre Day, 5th November
विश्लेषण : रंगभूमी दिन ५ नोव्हेंबरला का असतो? यंदा अद्याप साजरा का झाला नाही?
world eyes on donald trump dealing with big tech during his second term of us president
बलाढ्य टेक कंपन्यांसाठी ट्रम्प यांच्या विजयाचा अर्थ काय ?
Most robotic surgeries performed by Tata hospital in shortest time
टाटा रुग्णालयाकडून कमी कालावधीत सर्वाधिक रोबोटिक शस्त्रक्रिया

हेही वाचा >>> धमकीसत्र थांबेना… नवनीत राणा, रवी राणांना पोलीस सुरक्षा पुरविण्‍याची मागणी

दीडशेवर नागरिकांचा मृत्यू

सीताबर्डी, महाल, इतवारी, संत्रा मार्केट आणि धरमपेठ अशा गर्दीच्या ठिकाणी आणि गजबजलेल्या परिसरातही वाहने सुसाट चालवली जात आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका वाढता वाढत आहे. ऑक्टोबर महिन्यांपर्यंत जवळपास सहाशेवर अपघात झाले असून त्यामध्ये दीडशेवर जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा >>> Video : थरारक… ‘त्या’ दोन वाघिणींमध्ये तुंबळ लढाई, पर्यटकांच्या डोळ्यासमोर…

गजबजलेल्या रस्त्यावरुनही सुसाट

शहरातील सीताबर्डी, महाल, इतवारी, संत्रा मार्केट आणि धरमपेठ अशा गर्दीच्या ठिकाणी आणि गजबजलेल्या परीसरात रस्त्यावरुनही वाहने सुसाट चालविल्या जात आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका वाढता वाढत आहे. पायी चालणाऱ्यांच्या मनात सुसाट धास्ती बसली आहे. ऑक्टोबर महिन्यांपर्यंत जवळपास सहाशेवर अपघात झाले असून त्यामध्ये दीडशेवर जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. 

विशेष मोहीम राबवू-बाविस्कर

वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. तसेच सीसीटीव्हीच्या माध्यमातूनही सुसाट वाहन चालवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे, असे सहायक पोलीस आयुक्त (वाहतूक शाखा).माधुरी बाविस्कर यांनी सांगितले.