वर्धा लगतच्या नागठाना परिसरातील शेतात चालणारा अवैध देहविक्रीचा व्यवसाय मंगळवारी रात्री उजेडात आला. शेतातील झोपडीत कळंबचा जीवन दत्तू मोहरले हा अवैध व्यवसाय करीत होता. पोलिसांनी पाठविलेल्या बनावट ग्राहकाने जीवनशी संपर्क केल्यावर त्याने तेहत्तीस वर्षीय महिलेस या ग्राहकाच्या सुपूर्द केले. आर्थिक फायद्यासाठी हे कृत्य करण्यास आरोपी सदर महिलेस भाग पाडत असल्याचे सावंगी पोलिसांना आढळून आले.

हेही वाचा- नागपूरच्या जी-२०’ बैठकीत कशावर होणार चर्चा?

sex racket
पुणे: भोजपुरी फिल्ममधील अभिनेत्रीला जाळ्यात ओढून सेक्स रॅकेट; दलालास केली पोलिसांनी अटक
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
sex-racket
नागपूर: ‘सेक्स रॅकेट‘ उघडकीस, ग्राहकांकडून घ्यायचे ४ ते ५ हजार रुपये…

यावेळी आरोपीकडून व एका महिलेकडून पाचशेची एक नोट जप्त करण्यात आली. तसेच भ्रमणध्वनी संच, कंडोमचे पाकीट जप्त करण्यात आले. आरोपीवर संशय असल्याने त्याच्यावर आठ दिवसापासून पोलिस पाळत ठेवून होते. रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली.

Story img Loader