दारूबंदी असूनही जिल्ह्यात ठिकठिकाणी दारू विक्री सरसकट होत असल्याचे चित्र आहे. पोलीसांकडून रोज लाखो रुपये किंमतीची दारू जप्त करण्याची व विक्रेत्यांवर कारवाई करण्याची घडामोड नवी नाही. यास वचक बसावा म्हणून पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी विक्रेत्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करणे सुरू केले आहे. त्यातच आता स्थानबद्ध करण्याची कारवाई सुरू झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> चंद्रपूर : ‘बांबू लेडी’ मीनाक्षी वाळकेला लंडनचा पुरस्कार; ‘आयआयडब्ल्यू शी इन्स्पायर्स अवॉर्ड’ने होणार इंग्लंडमध्ये सन्मान

देवळी येथील अवैध दारू विक्रेता श्रावण हिरामण खेलकर याच्यावर विविध अठरा गुन्हे दाखल झाल्याची नोंद आहे. त्याच्यामुळे शहरातील शांतता भंग होत असल्याचा ठपका ठेवून ‘एमपीडीए’अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई करण्याचा प्रस्ताव ठाणेदारांनी पोलीस अधीक्षक मार्फत जिल्हाधिकारी यांना पाठविला. तो मंजूर झाल्याने आरोपी खेलकर यास वर्धा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. यामुळे अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. यापुढेही अशी कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police action under mpda act against liquor dealer in wardha pmd 64 zws