बुलढाणा : संतनगरी शेगावसह जिल्ह्याला हादरविणाऱ्या महादरोड्याची उकल करण्यात बुलढाणा पोलिसांना अखेर यश मिळाले. आजअखेर ४० लाखांचा ऐवज हस्तगत करण्यात आला असून ११ आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे. यातील बहुतांश नाशिक जिल्ह्यातील असून यात एका जोडप्यासह दोघा सख्ख्या भावांचा समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> नागपुरात बांधकामा दरम्यान जलवाहिनी फुटली, ‘या’ वस्त्यांचा पाणी पुरवठा विस्कळीत

१५ जानेवारी २०२३ ला शेगाव येथील व्यावसायिक आनंद पालडीवाल यांच्या बंगल्यातून तब्बल २५ लाख रुपये रोख रक्कमेसह हिरे, सोने, चांदीचे दागिने मिळून तब्बल ९२ लाख रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला होता. जिल्ह्यातील आजवरच्या सर्वात मोठ्या घरफोडीचा तपास करण्याचे कडवे आव्हान पोलीस विभागासमोर उभे ठाकले होते. घटनेची व्यापकता व गुंतागुंत लक्षात घेता पोलीस अधीक्षक सारंग आवाड यांनी तपास स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अशोक लांडे यांच्या कडे सोपविला. शाखेसह सायबर शाखेचे एक पथक नेमण्यात आले.

हेही वाचा >>> पालकमंत्र्यांना शोधा, ५० खोके मिळवा; अमरावतीत युवा सेनेचे आंदोलन

दरम्यान, तांत्रिक विश्लेषण मधून प्राप्त माहिती वरून विशेष पथकाने प्रारंभी बुलढाणा जिल्ह्यातील सोनाटी ( ता. मेहकर) येथील वैभव मानवतकर( २६)याला उचलले. त्याने गुन्ह्याची कबुली देत सहकाऱ्यांची नावे सांगितली. यानंतर मुंजा कहाते २०, प्रीतम देशमुख२९, (रा पिंप्री देशमुख, जिल्हा परभणी), अजिंक्य जगताप (२७, रा मुंगळा, जिल्हा परभणी), नवनाथ शिंदे (गंगाखेड जिल्हा परभणी) सुजित साबळे (२७, खडक मालेगाव, नाशिक) कैलास सोनार (२४, जेल रोड, नाशिक), मयूर ढगे २२ व सौरभ ढगे२६ (राहणार निफाड, नाशिक) हे बंधू, प्रवीण गांगुर्डे व पूजा गांगुर्डे( राहणार सातपूर, जिल्हा नाशिक) हे पतीपत्नी यांना अटक करण्यात आली. आजअखेर ४० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून उर्वरित कारवाई सुरू असल्याचे पोलीस अधिक्षकांनी सांगितले.