नागपूर: मध्यरात्रीला प्रेयसीच्या घरी भेटायला आलेल्या प्रियकराने इशारा केला आणि प्रेयसी कुटुंबीयांची नजर चुकवून बाहेर आली. सुरक्षित ठिकाण म्हणून दोघांनीही शौचालयाचा आसरा घेतला. काही वेळाने मुलीची आई लघुशंकेसाठी शौचालयाकडे आली. मात्र, दार उघडत नसल्याने तिने पतीला आवाज दिला. कुटुंबीय शौचालयाबाहेर जमा झाले. दार ठोठावून आवाज दिल्यानंतर मुलगी आणि तिचा प्रियकर शौचालयातून बाहेर आले. हे पाहताच कुटुंबीयांच्या संताप अनावर झाला. त्यांनी प्रियकराची चांगलीच धुलाई केली. जबरदस्त मार खाल्लेल्या प्रियकराला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. सावनेर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीची मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली.

शुभम रापूते हा मूळचा सावंगी गावचा रहिवासी असून एका खासगी कंपनीत नोकरी करतो. सावनेरमध्ये राहणारी १७ वर्षीय मुलगी स्विटी (काल्पनिक नाव) ही बाराव्या वर्गात शिकते. ती दहावीत असताना शाळेच्या वार्षिक स्नेहमिलनाच्या कार्यक्रमाला शुभमला डेकोरेशन आणि साऊंड सिस्टमसाठी बोलावले होते. त्या कार्यक्रमात स्विटीला दोन गाण्यांवर नृत्य करायचे होते. यासाठी तिने शुभमकडे आपला मोबाईल दिला. त्याने स्विटीच्या मोबाईलवरून स्वत:च्या मोबाईलवर मिसकॉल दिला.

A young man was brutally beaten to death due to an immoral relationship in Nagpur
विवाहित प्रेयसीची अंधारातील भेट प्रियकराच्या जीवावर बेतली
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
kalyan rape murder case vishal gawali
Video : शेगावात वैद्यकीय तपासणीनंतर विशाल गवळीची कल्याणकडे रवानगी, मध्यरात्री…
youth murder due to love affair in beed
बीड : प्रेम संबंधातून बीड येथील युवकाचा खून करून मृतदेह कालव्यात फेकून दिला
Police arrested three men for killing young man on Tuljaram College Road Baramati
बारामतीत तरुणाचा खून करुन पसार झालेले तिघे, गजाआड
fake baba satara loksatta news
सातारा : मालमत्ता हडपण्याचा प्रयत्न; माणमध्ये भोंदूबाबाला अटक
Educational institution director remanded in police custody for negligence in sexual assault case
लैंगिक अत्याचार प्रकरणी दुर्लक्ष केल्याचा ठपका, शिक्षण संस्थाचालकाला न्यायालयीन कोठडी
घरफोडी करणार्‍या आरोपीला २४ तासात बेड्या

हेही वाचा… नागपूरहून पुण्याला जाणा-या रेल्वेगाड्यांच्या वेळेत बदल; जाणून घ्या सुधारित वेळापत्रक…

कार्यक्रम संपल्यानंतर दोन दिवसांनी शुभमने तिला मेसेज केला. दोघांचीही चॅटिंग सुरू झाली. हळूहळू त्याचे रूपांतर प्रेमात झाले. भेटी वाढल्या आणि प्रेमाला रंग चढला. शुभम तिला भेटायला गावावरून सावनेरला येऊ लागला. घरी कुणी नसताना अनेकदा स्विटीच्या घरीसुद्धा आला. यादरम्यान शुभम एका कंपनीत नोकरीला लागला तर स्विटी बारावीत शिकत होती.

हेही वाचा… परदेशी पाहुण्यांचे आगमन! गोंदिया जिल्ह्यातील धरण व तलावांवर स्थलांतरित पक्ष्यांच्या ५० हून अधिक प्रजातींचा चार महिने मुक्काम

शनिवारी दोघांनी भेटायचे ठरविले. ठरल्याप्रमाणे मध्यरात्रीला शुभम स्विटीच्या घरी आला. त्याने काही अंतरावर दुचाकी ठेवली आणि स्विटीच्या घरासमोर असलेल्या शौचालयात गेला. त्याने मेसेज केला आणि काही वेळातच स्विटी आली. दोघेही शौचालयात भेटून गप्पा करीत होते. मध्यरात्री साडेबारा वाजताच्या दरम्यान स्विटीची आई लघुशंकेसाठी शौचालयाकडे आली. पण, शौचालयाचे दार काही केल्या उघडत नव्हते. आईला संशय आल्याने तिने पती व दोन्ही मुलांना बाहेर बोलावले. दार ठोठावल्यानंतर स्विटीने आतून आवाज दिला. काही वेळात तिने शौचालयाचे दार उघडले. आतमध्ये तिच्या प्रियकराला पाहून कुटुंबीय संतापले. त्यांनी शुभमला चांगला चोप दिला.

Story img Loader