अकोला : म्हैसपूर येथील शिवमहापुराण कथेमध्ये भक्तांच्या सोनसाखळीवर हात साफ करणाऱ्या महिलांसह १० जणांच्या आंतरराज्य टोळीला स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

म्हैसपूर येथे शिवमहापुराण कथा सुरू आहे. त्याठिकाणी भाविकांची मोठी गर्दी उसळली. त्याचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणारी महिलांचीच टोळी सक्रिय झाली. चोरीच्या अनेक घटना घडल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सोनसाखळी चोरी गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना दिल्या. शिवपुराण कथा संपल्यानंतर जेवण करण्यासाठी जाणाऱ्या महिलांच्या गर्दीचा फायदा घेऊन त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरी करताना राज्यातील व इतर राज्यातील एकूण १० जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये आशा हरीलाल धोबी, मुंजूदेवी धोबीरा, चंदा सोनु धोबी, अनिता सुरेश धोबी (सर्व रा.नागपूर), कमलेश सुरजलाल बावरीया, शशी रिकू बावरीया, कश्मीरा हिरालाल बावरीया (तिन्ही रा.भरतपुर, राजस्थान), प्रिया संदीप उन्हाळे, सुरया राप्रसाद लोंडे (दोन्ही रा.वर्धा), लता किशन सापते (रा.इंदोर) यांचा समावेश आहे. त्यांची झडती घेतली असता मणी डोरलेचे तीन जोड, दोन मंगळसूत्र असा एकूण एक लाख ८२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

हेही वाचा – वर्धा : वादग्रस्त उपविभागीय अधिकाऱ्याची अखेर बदली

या प्रकरणी पुढील तपास बार्शीटाकळी पोलीस करीत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदिप घुगे, अपर पोलीस अधीक्षक मोनिका राउत, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष राउत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष महल्ले, गोपाल ढोले, महेश गावंडे, गोपीलाल मावळे, फिरोज खान, भास्कर धोत्रे, खुशाल नेमाडे, मो.अमिर, आकाश मानकर, धीरज वानखडे आदींच्या पथकाने केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police arrested an inter state gang that stole gold chains from devotees in the shiva mahapuran story in mhaispur ppd 88 ssb
Show comments