सर्वात सुरक्षित स्थान समजल्या जाणाऱ्या जिल्हा न्यायालयात एक गुंड चाकूसह पोहचला. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्या गुंडाला चाकूसह पोलिसांनी अटक केली. स्वप्निल जसवंत गजभिये (२८, जयभोलेनगर,खापरखेडा) असे आरोपीचे नाव आहे. शुक्रवारी सायंकाळी ५.४५ वाजता स्वप्निल हा जिल्हा न्यायालयाच्या परिसरात शिरला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> जागतिक व्याघ्र दिनी वाघीण मृतावस्थेत आढळली; वनखात्यात खळबळ

काही वेळपर्यंत तो कुणाच्यातरी शोधात होता. त्याच्या हालचाली संशयास्पद होत्या. त्यामुळे सुरक्षा व्यवस्था सांभाळणारे पोलीस निरीक्षक सीरसाठ, सहायक निरीक्षक तायडे, उज्ज्वला खोताडे आणि राजेंद्र सरगणे यांची नजर स्वप्निलकडे गेली. त्यांनी मोठ्या शिताफीने  सापळा रचला. त्याला कळण्यापूर्वीच झडप घालून ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता मोठा चाकू आढळून आला. त्याच्या विरुद्ध सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून अटक करण्यात आली.