नागपूर : बारा वर्षीय मुलीच्या गुप्तांगाला चटके देऊन लैंगिक शोषण केल्याप्रकरणातील तिसरी आरोपी हिना खान हिच्या अटकेसाठी हुडकेश्वर पोलीस टाळाटाळ करीत असल्याचा आरोप अथर्वनगरीतील नागरिकांनी केला आहे. गेल्या तीन दिवसांपासून हुडकेश्वर पोलिसांचे पथक बेंगळुरुला गेले असून अद्याप हिना सापडली नसल्याची माहिती ठाणेदार जग्वेंद्रसिंग राजपूत यांनी दिली.

हेही वाचा >>> जेवणाच्या ऑर्डरवरून झाला वाद, बार मालक आणि नोकरांनी पोलीस कर्मचाऱ्याला धुतले, पोलिसानेही हॉकी स्टिकने केली मारहाण

vasai gangrape marathi news
अश्लील चित्रफितीच्या आधारे धमकावले, अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
40 year old construction worker arrested for sexually assaulting eight year old boy in Bijlinagar of Chinchwad
पिंपरी : चिंचवडमध्ये आठ वर्षीय मुलावर अत्याचार
class 6 girl school raped in Porbandar
शिक्षकाचा सहावीतल्या विद्यार्थीनीवर बलात्कार; वाच्यता केल्यास खिडकीतून फेकण्याची दिली होती धमकी
Saif Ali Khan Records Statement With Mumbai Police
Saif Ali Khan : सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपी मोहम्मद शहजादला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
shoes of accused in Saif attack case seized Mumbai crime news
पोलिसांच्या हाती आणखी पुरावे; सैफ हल्ला प्रकरणातील आरोपीचे बूट जप्त
truth and dare rape news
पिंपरी : रावेतमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार
Auto rickshaw driver arrested for raping young woman
मुंबई : तरूणीवर बलात्कार करणाऱ्या रिक्षाचालकाला अटक

गरीब चौकीदाराच्या १२ वर्षीय मुलगी शिना (काल्पनिक नाव) घरकाम करण्यासाठी कोट्यधीश असलेल्या हिना खानने विकत घेतले होते. तिला घरी ठेवून तिला हार्मोन्स वाढविण्याची इंजेक्शन आणि गोळ्या देण्यात आल्या होत्या. शिनाकडून घरातील सर्व काम करून घेण्यात येत होते. तिला शिक्षणापासून हिनाने वंचित ठेवले होते. पती अरमान खान आणि भाऊ अझहर शेख या विकृत जोडीने शिनाच्या गुप्तांगाला सिगारेटचे चटके देऊन अनन्वित छळ करण्यात आला होती. तिच्या छातीला,पाठीला आणि पोटाला गरम चमच्याने चटके देण्याचे व्रण दिसत होते. तिच्यावर अरमान आणि अझहर हे दोघेही लैंगिक अत्याचार करीत होते. शिनाला बाथरुमध्ये बंद करून हिना ही पती आणि भावासह माहेरी गेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आली. शेजाऱ्यांच्या सतर्कतेने शिनाला जाचातून मुक्त करण्यात आले. एवढे संवेदनशिल प्रकरण असताना हुडकेश्वरचा पोलीस उपनिरीक्षक बाळू राठोड आरोपींना पोलीस ठाण्यात मोबाईल आणि हॉटेलचे जेवन पुरवित होता. ही बाब नागरिकांना खटकल्यानंतर चौकशीअंती राठोडला निलंबित करण्यात आले. या संवेदनशिल प्रकरणाचा तपास पीएसआय राठोड आणि नंतर ठाणेदार जग्वेंद्रसिंह राजपूत यांच्याकडे देण्यात आला. पुरुष अधिकाऱ्यांना तपास दिल्यामुळे या प्रकरणाला आणखी वेगळे वळण लागले आहे.

हेही वाचा >>> संविधानात दुरूस्‍ती केल्‍याशिवाय ‘इंडिया’ हटवता येणार नाही

शिनाच्या वडिलाला अटक सात मुली असल्याने करोना काळात उदरभरणाचा समस्या असल्याचे सांगून मुलीला हिनाला सोपविल्याचे पीडित शिनाचे वडिल पोलिसांना सांगत आहे. परंतु, हा प्रकार मानव तस्करी-विक्रीच्या गुन्ह्यात मोडतो. त्यामुळे मुलीच्या वडिलाला हुडकेश्वर पोलिसांनी अटक केली.

Story img Loader