बुलढाणा: रात्रीची गस्त घालणाऱ्या पोलीस वाहनातील ‘फोन’ खनाणला… त्यांना डिझेल चोरांच्या टोळीची ‘टीप’ मिळाली … मग पोलिसांनी ‘त्या’ वाहनाचा सिनेस्टाईल पाठलाग सुरू केला… चोरांच्या वाहनाचा अपघात झाला आणि त्यातून पोलिसांनी चोरलेल्या डिझेलचा साठा जप्त केला…
अपघात पाठोपाठ चोरट्यांच्या कारनाम्याने गाजत असलेल्या हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी द्रुतगती महामार्गावर शुक्रवारी, १३ सप्टेंबर रोजी उत्तररात्री साडेतीन ते चार वाजताच्या सुमारास हा थरार रंगला. समृद्धी महामार्गावर सुसज्ज चोरट्यांच्या टोळ्यांचे कारनामे आणि डिझेल चोरीच्या घटना काही नव्या नाहीत. पोलिसांच्या नाकावर टिच्चून प्रामुख्याने मालवाहू वाहनातून डिझेल चोरी केली जाते. मात्र आज उत्तररात्री झालेल्या घटनेत चोरांच्या वाहनाला अपघात झाल्याने ही घटना वेगळी ठरली. यामुळे डिझेल चोरी करणाऱ्या टोळीला चांगली अद्दल घडली.
आज उत्तररात्री पोलीस उपनिरीक्षक उज्जैनकर, पोलीस जमादार निवृत्ती सानप, अरुण भुतेकर, संदीप किरके, योगेश शेळके हे फरदापुर जिल्हा (संभाजीनगर ते दुसरबीड तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा) दरम्यान वाहनाने रात्रीची गस्त घालत होते. दरम्यान गस्त पथकाला छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस नियंत्रण कक्ष मधून डिझेल चोरीची माहिती देण्यात आली. पोलीस उपकेंद्र दुसरबीड -फरदापुर – सिंदखेडराजा जवळ मुंबई कॉरिडोर क्रमांक ३१० वर उभ्या असलेल्या मालवाहू वाहनातून मधून इंडिगो मधील चार ते पाच जण डिझेलचोरी करीत असल्याची माहिती संभाजी नगर पोलिसांनी दिली. याची दखल घेत पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांना आलेले पाहून इंधन चोरट्यांनी टाटा इंडिगो कार ( एम एच २८ व्ही ९३१० क्रमांकाच्या)
हे ही वाचा…राहुल गांधी विरुद्ध भाजप आक्रमक,अमरावतीत पुतळा जाळला
ने पळ काढला. गस्त पथकाने इंडिगो गाडीमधील ४ ते ५ जणांचा सिने स्टाईल पाठलाग केला. यामुळे भयभीत चालकाचे भरधाव वाहनावरील नियंत्रण सुटले आणि इंडिगो कार चॅनेल क्रमांक ३१४ मुंबई कॉरिडोर जवळच्या गेटवर धडकली. या अपघातात जखमी झालेला चालक पोलिसांच्या हाती लागला. मात्र त्याचे इतर साथीदार अंधाराचा फायदा घेत पसार झाले. चोरट्यांच्या वाहनातून ३५ लिटर डिझेलच्या दहा छोट्या टाक्या जप्त केल्या. पथकाने इंडिगो वाहन, जप्त डिझेल साठा, आणि जखमी कार चालक याला बीबी पोलीस ठाणे कर्मचाऱ्यांच्या स्वाधीन केले आहे. जखमी चालकावर उपचार करण्यात आले आहे. महामार्ग आणि बीबी पोलीस ठाण्याचे पथक अपघातानंतर फरार झालेल्या इतर आरोपींचा शोध घेत आहे.
हे ही वाचा…वर्धा : हिंगणघाटच्या वैद्यकीय महाविद्यालयाची जागा अखेर ठरली, प्रवेशाबाबत ..
अपघात आणि चोऱ्या
घाई गडबडीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्ग चे लोकार्पण करण्यात आले. मात्र हा मार्ग प्रारंभीपासून लहान मोठे वाहन अपघात आणि चोरीच्या घटनांनी गाजत आहे.अपघात आणि चोरीच्या घटनांची ही मालिका अजूनही कायम आहे. या मार्गावर डिझेल चोरणाऱ्या सुसज्ज टोळ्यांचे कारनामे देखील सुरूच आहे. समृद्धी मार्गावरील उभ्या मोठ्या वाहनाच्या इंधन टाकीतून सहज डिझेल चोरी करणारी ही टोळी स्वतःच्या चार चाकी वाहनाने लगेच फरार होऊन आपल्या जिल्ह्यात पोहोचते. इतरही अनेक बेकायदेशीर धंदे सुरु असून, लुटमार व चोऱ्यांचे प्रमाण वाढीस लागले आहे.