अकोल्यात पोलीस कर्मचाऱ्याने शहरातील दक्षता नगर येथील पोलीस वसाहत परिसरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. संजय सोळंके असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून पोलीस कर्मचाऱ्याने टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी सुसाईड नोट लिहुन ठेवली होती. या घटनेमुळे अकोला जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलीस मुख्यालयात संजय सोळंके हे कार्यरत होते. त्यांनी आज अकोल्याच्या पोलीस वसाहत परिसरात झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेची माहिती मिळताच खदान पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. या प्रकरणी खदान पोलीस तपास करीत आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police constable commits suicide in akola sgy